Rashmika Mandanna | रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय चांगलाच ट्रोल; चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन | दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. नुकतच रश्मिकाने (Rashmika Mandanna) अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला फारसे यश मिळवता आले नाही. मात्र तरीही चित्रपटातील रश्मिकाच्या (Rashmika Mandanna) अभिनयाची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता रश्मिका (Rashmika Mandanna) लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे.

रश्मिका मंदानाच्या आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटाचा टीझर अगदी काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची मनं जिंकली असून आता प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाअगोदर रश्मिकाने (Rashmika Mandanna) एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या त्या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रश्मिका मंदाना ही या व्हिडीओमध्ये ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग’ करत असल्याच्या प्रतिक्रिया ट्रोलर्सने दिल्या आहेत.

रश्मिकाचा (Rashmika Mandanna) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने
त्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, “असं वाटतंय की कराटे मॅचसाठी आली आहे आणि प्रत्येकवेळी
तीच सेम हाताची पोझ का देते? झालं ना चित्रपटात आता संपलं सगळं.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की,
“ती हाताची पोझ नेहमीच का देत असते. आता हे खूपच कंटाळवाणं वाटत आहे.
” तर अजून एकजण लिहितो की, “आता खूप झालं हिचं… कार्टुनसारखी दिसतेय… शिनचॅनची बहीण दिसतेय.”
त्याचबरोबर काहींनी तिच्या ड्रेसला टार्गेट करत तिचा ड्रेस कराटे युनिफॉर्मसारखा दिसत असल्याचं देखील म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कन्नड चित्रपटांमध्ये तिच्यावर बंदी घातल्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे चांगलीच चर्चेत
आली होती. ती म्हणाली होती, ‘जे काही आत घडतं ते आतचं राहतं.
मी माझ्या इनबॉक्समध्ये काय घडतय हे लोकांना कधीही सांगत नाही.
मला वाटत नाही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण लोकांनीच या गोष्टीवर ओव्हररिऍक्ट केले आहे.’
रश्मिकाचा (Rashmika Mandanna) ‘मिशन मजनु’ हा चित्रपट १९ जानेवारीला रिलीज होत आहे.

Web Title :- Rashmika Mandanna | rashmika mandana trolled for over acting netizens says shinchan ki bahan lag rahi hai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…