उंदीर आणि गोगलगाय खाऊन जगणाऱ्या ‘या’ समाजावर उपासमारीचे संकट

लखनौ: वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कुटुंब उपासमारीमुळे उध्वस्त झाल्याचे समोर आले होते. सोनवा देवी आणि रकबा दुलमा पट्टी गावातील विरेंद्र मुसाहर यांचे संपूर्ण कुटुंब  उपासमारीची शिकार झाले होते. उत्तर प्रदेश सरकार सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा करत असताना सोनवा देवीच्या दोन मुलांचा आजार आणि उपासमारीने मृत्यू झाला होता. विरेंद्र यांची पत्नी संगीता (३०) त्यांचा सहावर्षांचा मुलगा शाम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू प्रामुख्याने उपासमारीने झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88361757-cb18-11e8-b5d2-7b4927568b04′]
 उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकाऱ्यांच्या मते हे मृत्यू उपासमारीने झालेले नाहीत. दोन मुलांच्या मृत्यूनंतर सोनवा देवीच्या घरी प्रशासनाकडून धान्य पोहोचवण्यात आले. ते पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी उसळली होती. सोनवा देवीच्या घरी धान्य पोहोचले ती किती भाग्यवान आहे अशी चर्चा त्या गर्दीमध्ये सुरु होती. सोनवा देवी, विरेंद्र हे दोघेही मुसाहर समाजातील आहेत. महादलितांमध्ये मोडणाऱ्या मुसाहर समाजातील लोकांचे मुख्य अन्न उंदीर आहे. काही वेळेस गोगलगाय खाऊनही हे लोक दिवस ढकलतात.
[amazon_link asins=’B00GZ61W4G,B01MR6OKR0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9545e782-cb18-11e8-9fa4-abdfdd52692c’]

उत्तर प्रदेश सरकारच्या मते, विरेंद्रची पत्नी संगीता आणि तिच्या मुलांचा डायरीयाने मृत्यू झाला त्याचा उपासमारीशी काहीही संबंध नाही. सोनवा देवीच्या दोन्ही मुलांचा ह्दयरोग आणि टीबीमुळे मृत्यू झाला असे खुशीनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हरीचरण सिंह यांनी सांगितले. दुसरे अधिकारी राकेश कुमार यांनी वैद्यकीय चाचण्यांमध्ये दोन्ही मुलांना टीबी नसल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. पण ही बाब उघड करु नये यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा दबाव होता असे सांगितले. मुसाहर समाज आणि सरकारकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत. उंदीर आणि गोगलगायीवर उपजिवीका करणारा हा मुसाहर समाज सध्या उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाची कारवाई