Ratan Tata यांच्या नावाने लोकांना चूना लावत आहेत ठग, आता होणार कायदेशीर कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ratan Tata | टाटा उद्योग समूहाचे (Tata Group Of Industries) मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे सर्वसामान्य लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून काही समाजकंटक टाटांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. रतन टाटा यांनी स्वतः इंस्टाग्रामवर (Ratan Tata Instagram) ही माहिती दिली आणि आता याप्रकरणी कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले. (Ratan Tata)

 

मदतीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतात ठग
टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तीन स्लाईड्स शेअर केल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या बनावट फेसबुक पेजबद्दल (Ratan Tata Fake Facebook Page) माहिती दिली. सर्वसामान्यांना जागरुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज सुरू असून, ते मदतीचे नाटक करून टाटांच्या सहयोगींच्या नावाने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत.

 

रतन टाटा यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या पहिल्या स्लाईडमध्ये लिहिले आहे की, माझ्या सहकार्‍यांच्या नावावर सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक करणार्‍या या फसवणूक फेसबुक पेजबद्दल तुम्हाला माहिती देत आहे. आम्ही कोणत्याही स्वरूपात निधी घेत नाही.

 

टाटांच्या नावाने अनेक बनावट फेसबुक अकाऊंट
टाटांनी ज्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे त्याचे नाव ’रतन टाटा फाउंडेशन’ (Ratan Tata Foundation) आहे आणि ते चॅरिटेबल ऑर्गनायझेनच्या कॅटेगरीत लिस्टेड आहे. पेजच्या प्रोफाईल आणि कव्हर दोन्हीवर रतन टाटा यांचा फोटो आहे.

 

मात्र, आता ते पेज फेसबुकवर उघडता येत नाही. रतन टाटा अधिकृतपणे फेसबुक वापरत नाहीत. असे असतानाही त्यांच्या नावाने अनेक फेक फेसबुक प्रोफाईल, पेज आणि ग्रुप सुरू आहेत. रतन टाटा सोशल मीडियाच्या नावावर फक्त ट्विटर (Twitter) आणि इंस्टाग्राम वापरतात.

या ईमेलद्वारे व्हेरिफाय करा टाटा संबंधित गोष्टी
तर दुसर्‍या स्लाईडमध्ये, रतन टाटा यांनी त्यांच्या सहकार्‍यांना त्या पृष्ठाची तक्रार करण्याची विनंती केली.
यासोबतच फसवणूक करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.
त्यांनी लिहिले आहे की, आम्ही याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करू, तोपर्यंत तुम्ही रिपोर्ट करा.

 

शेवटच्या स्लाइडमध्ये, त्यांनी एक ईमेल आयडी शेअर केला आहे
ज्यावर टाटा समूहाशी संबंधित कोणताही दावा मेल पाठवून व्हेरिफाय केला जाऊ शकतो.
त्यांनी म्हटले आहे की, [email protected] वर ईमेल पाठवून नेहमी सत्यता तपासा.

 

Web Title :- Ratan Tata | ratan tata reacts about fake facebook page on his name says will take legal action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

 

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने दिला 600% रिटर्न, अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी?

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल