Ration Card | रेशन कार्ड काढायचे आहे का? तर अतिशय आवश्यक आहेत ‘ही’ कागदपत्रे, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

नवी दिल्ली : रेशन कार्ड (Ration Card) साठी कुणीही भारतीय व्यक्ती अप्लाय करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये टाकली जातात. वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही वेगळे रेशन कार्ड (Ration Card) काढू शकता. प्रत्येक राज्यात रेशन कार्डसाठी अप्लाय करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. काही राज्यात ऑनलाइन अप्लाय करता येते.

रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

मतदान कार्ड / मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, अ‍ॅड्रेस प्रुफ, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो (2 पासपोर्ट साईज फोटो), वीज/पाण्याचे बिल/टेलीफोन बिल (कोणतेही एक). भारत सरकारद्वारे जारी कोणतेही कागदपत्र.

असे करा अप्लाय

– जर तुम्ही उत्तर प्रदेशचे राहणारे असाल तर https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वर अ‍ॅक्सेस करून फॉर्म डाऊनलोड करू शकता.

– यानंतर त्यामध्ये सर्व माहिती भरून आपल्या भागातील रेशन डीलर किंवा अन्न पुरवठा विभागात द्या.

– अर्जासाठी तहसीलमध्ये यासंबंधीच्या अधिकार्‍यांशी सुद्धा संपर्क साधू शकता.

– तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता.

– रेशन कार्डचा फॉर्म सोपवल्यानंतर स्लिप घेण्यास विसरू नका.

– रेशन कार्डसाठी अर्ज शुल्क 5 ते 45 रुपयांपर्यंत आहे.

उत्पन्नाच्या आधारावर बनते रेशन कार्ड

सामान्यपणे रेशनकार्डचे तीन प्रकार आहेत. दारिद्रय रेषेच्या वरील लोकांना एपीएल, दारिद्रय रेषेखालील लोकांना बीपीएल आणि सर्वात गरीब कुटुंबांना अंत्योदय. ही विभागणी वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर ठरते. यानुसार अन्नधान्य ठराविक किंमतीत मिळते.

हे देखील वाचा

Pune Crime | कोयत्याने वार करत आईचा खून, पुण्यात अल्पवयीन मुलाचे कृत्य

ICICI Bank सह 3 बँकांनी सुरू केली नवीन सुविधा ! आता केवळ मोबाइल नंबरवरून पाठवू शकता 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ration Card | you can apply for ration card online and offline eligibility and required documents check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update