Raveena Tandon | अभिनेत्री रविना टंडनने बॉडीशेमिंग बाबत सांगितला धक्कादायक किस्सा; म्हणाली – ‘त्यावेळी लोक माझ्या मांड्यांवर…’

पोलीसनामा ऑनलाइन : Raveena Tandon | बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्यातरी बॉलीवूड पासून लांब जरी असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आज रविनाचे अनेक चाहते देखील आहेत. रवीनाने तिच्या एका मुलाखतीमध्ये 90 व्या दशकातील चित्रपटसृष्टीतील काही गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिने कोण कोणत्या गोष्टींचा सामना केला आहे, त्याचबरोबर 90 व्या दशकातील पत्रकारितेवरही तिने भाष्य केले आहे. (Raveena Tandon)

रवीना टंडनचे वडील रवी टंडन हे तेव्हाचे मोठे दिग्दर्शक होते. यामुळे सिनेसृष्टीत येण्यासाठी रवीनाला जास्त स्ट्रगल करावा लागला नाही. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करताच रवीनाला बॉडीशेमिंगचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला. लोक तिला टोमणे देखील द्यायचे. एवढेच नाही तर रवीनाने मुलाखतीमध्ये सांगितले की कशा पद्धतीने पत्रकार महिलांचं वर्णन ही केलं होते एवढेच काय तर तिच्या शरीराच्या विशिष्ट भागांवर आवर्जून लिहीत तिची खिल्ली उडवायचे. (Raveena Tandon)

यावेळी बोलताना रवीना म्हणाली, “त्यावेळी मला बऱ्याच गोष्टी पटायचं नाही. जर एखादी स्टेप मला खटकली तर मी ते लगेच बोलून दाखवायचे. एवढेच नाही तर मी स्विमिंग कॉस्ट्यूम त्याचबरोबर किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. एवढेच काय तर मी एकमेव अशी अभिनेत्री होते जिने रेप सीन दिला पण त्यात माझे कपडे फाटलेले तुम्हाला दिसणार नाहीत कारण मी अटच तशी घातली होती.

या सगळ्या गोष्टींमुळे मला प्रचंड घमेंड आहे असे लोकांना वाटायचे. मला खूप काही बोललं गेलं.
माझ्या मांड्यांवरून मला कमेंट करण्यात आल्या.
तिच्या मांड्या किती मोठ्या आहेत ‘थंडर थाईज’ असे देखील बोलले गेले.
मी केवळ 16 वर्षाची असतानाच कामाला सुरुवात केली होती.
तेव्हा मी जाड होते मात्र आता मला याचा काहीच फरक पडत नाही. मी जशी आहे तशीच राहायला मला आवडते”.
एवढेच नाही तर 90 च्या दशकातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही खटणाऱ्या गोष्टींमुळे चित्रपटातून ब्रेक
घेतल्याचेही रवीनाने स्पष्टपणे सांगितले.

Web Title :- Raveena Tandon | bollywood actor raveena tandon reveals her only condition about rape scenes in films

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chinchwad Bypolls | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवाराने आणली चक्क एवढ्या हजार रूपयांची चिल्लर

Balasaheb Thorat | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर इंदुरीकर महाराजांची स्तुतीसुमने; म्हणाले…

Manmad Accident News | मुंबई-आग्रा महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; 40 प्रवासी जखमी