Raveena Tandon | रविना टंडननं पार पाडलं ‘मुला’चं कर्तव्य, केले वडिलांवर अंत्यसंस्काराचे सर्व विधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raveena Tandon | बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसाठी (Raveena Tandon) हा काळ खूप कठीण आहे. शुक्रवारी पहाटे रवीना टंडनचे वडील आणि दिग्दर्शक रवी टंडन Ravi Tandon (वय 86) यांचे निधन (Died) झाले. मुंबईतील (Mumbai) जुहू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच काही जुन्या चित्रांमधून तिने आपल्या वडिलांची आठवण काढली. आता वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी रवीना टंडनने पार पाडले.

 

रवीना टंडनने (Raveena Tandon) स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली. वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना रवीना टंडनने लिहिले की, ”तुम्ही नेहमी माझ्यासोबत असाल, मी नेहमीच तुमची असेन. तूम्ही सदैव माझ्या सोबत असाल. लव्ह यू बाबा.”

 

वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने स्वत:ला सावरत वडिलांचे अंतिम संस्कार केले. रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी रवीनासोबत तिचे पती अनिल थडानी (Anil Thadani) आणि भाऊ राजीव टंडन (Rajiv Tandon) होते. या फोटोंसमोर अभिनेत्री तिच्या वडिलांच्या मृतदेहासमोर अग्नीचे भांडे घेऊन जाताना दिसत आहे.

 

दरम्यान, रवी टंडन यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1935 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे झाला. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ज्यामध्ये ‘दु:ख’, ‘नजराना’, ‘मजबूर’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’ या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.

 

Web Title :- Ranveer Singh-Deepika Padukone | shirtless ranveer Singh olichimb deepika Padukone bollywoods cool couple beach hot liplock

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा