Ravikant Shukla | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन : भारताचा माजी क्रिकेटर रविकांत शुक्ला (Ravikant Shukla) याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविकांत याची सुमारे 71 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याने या फसवणुकीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रविकांत शुक्लाने याजदान बिल्डरविरोधातवर 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. रविकांत शुक्लाने (Ravikant Shukla) हजरतगंज पोलिस ठाण्यात याजदान बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
रविकांत याने याजदान बिल्डरकडून अपार्टमेंट विकत घेतले होते. त्यावेळी या अपार्टमेंटचे बांधकाम एलडीएच्या नियमांनुसार वैध असल्याचे बिल्डरकडून सांगण्यात आले होते. परंतु नंतर हे अपार्टमेंट बेकायदा जमिनीवर बांधल्याचे उघडकीस आल्याने एलडीएने डिसेंबरमध्ये अपार्टमेंट बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त केले. त्यामुळे रवीकांतचे सगळे पैसे बुडाले. यानंतर रविकांतने याजदान बिल्डरकडून त्याचे 71 लाख रुपये परत करण्याची मागणी केली. मात्र त्याला बिल्डरकडून पैशांच्या बदल्यात जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर रविकांतने पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कोण आहे रविकांत शुक्ला ?
35 वर्षीय भारतीय क्रिकेटर रविकांत शुक्ला (Ravikant Shukla) हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील
रहिवासी आहे. त्याने 2006 रोजी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, पियुष चावला
हे आघाडीचे खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर 19 संघात खेळले आहेत.

Web Title :-  Ravikant Shukla | indian cricketer ravikant shukla has been cheated of rs 71 lakh and has received death threats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Chitrashi Rawat | ‘चक दे इंडिया’ फेम चित्राशी रावतनी 11 वर्षे डेटींगनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K Viswanath Passes Away | ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेते तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन