Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis | …तर फडणवीस यांना नमस्कार घालायलाही माणूस नसेल : रवींद्र धंगेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis | ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, अशा शब्दांत पुण्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे उमेदवार (Congress Candidate) रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. मात्र, धंगेकर यांनी फडणवीसांवर टीका करतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आपण पाहिलेत, पण कोरोना काळात केलेले श्रेय हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच द्यावे लागेल असे ते म्हणाले.(Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis)

रवींद्र धंगेकर म्हणाले, पवार कुटुंब फुटू नये असे कार्यकत्र्यांना वाटत होते. पण दादाला कसे नेले हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपने (BJP) मित्रपक्ष शिवसेनेला त्रास दिला आता अजित पवारांना काय करतील सांगता येत नाही.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या ३ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. याबाबत धंगेकर म्हणाले, ही सभा देशाच्या मुद्यावर होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी येत आहेत. मोदींच्या सभेला उत्तर म्हणून ही सभा नाही, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

येथील खासदारांनी काय कामे केली ते सांगावे? नुसते भाषण करून काय होते? भोर, वेल्ह्याची काय अवस्था झाली आहे.
सत्ता असताना विकास करायला काय झाले होते, असा सवाल पवार यांनी सुप्रिया सुळे यांना केला.

या सभेला विजय शिवतारे, नीलम ताई गोऱ्हे, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे,
रमेश कोंडे, शरद ढमाले, जीवन कोंडे, बाळासाहेब चांदेरे, अमोल पांगारे, बाळासाहेब गरुड, प्रताप शिळीमकर आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonikand Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईसह तिघांवर गुन्हा

Attack On Journalist In Pimpri | पिंपरी : तहसिलदाराकडे तक्रार केल्याच्या रागातून पत्रकाराला मारहाण

Sambhajiraje Chhatrapati On BJP | 272 म्हणायला अवघड होतं मग 300 म्हणा, पण 400 पार म्हणजे…, संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका!