औरंगाबाद विमानतळाला संभाजीराजेंचे नाव द्या ; राज्यमंत्र्याने केली मागणी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  – औरंगाबाद येथील विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करण्यात यावे अशी मागणी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भात मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची हिंदू स्वराज्य निष्ठा, धर्मनिष्ठा, मूलतत्ववाद वाखाणण्या जोगा होता. स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कृती आणि आचरणातून एक आदर्श राजाचे उदाहरण जगापुढे घालून दिले आहे. अशा शूर आणि पराक्रमी राजाचे नाव औरंगाबाद विमानतळाला समर्पक आणि यथोचित राहील असे मत वायकर यांनी आपल्या पत्राता म्हणले आहे.

या आधी देखीलअशी मागणी करण्यात आली होती. १ एप्रिल २०११ रोजी विधानसभा सभागृहात अशासकीय ठराव मांडण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीने नामकरणाचा प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेने देखील संभाजीराजेंचे नाव विमान तळाला देण्याचा ठराव करून राज्य शासनाला पाठवला आहे. मात्र विमानतळाच्या नामकरणाच्या विषयात कसलीही प्रगती नझाल्याचे रवींद्र वायकर यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.

ह्या हि बातम्या वाचा

नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, ७ कोटी खर्च दाखवून लाचखोरी : नवाब मलिक

दहशतवादी हाफीज सईदवर युएनकडून बंदी कायम

मार्चअखेर कर्ज होणार स्वस्त