‘या’ कारणांमुळं RBI ला चक्क मोबाईल कंपन्यांची ‘भीती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयनं गुरुवारी (दि. 5) रोजी आर्थिक धोरण जाहीर केलं. यात रेपो रेटमध्ये कोणतीही घट केलेली नव्हती. आरबीआयनं म्हटलं होतं की, महागाई वाढण्याचा अंदाज असल्यानं रेपो रेटमध्ये घट होणार नाही. बँकेनं असंही म्हटलं होतं की, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांच्याकडून दर वाढल्यानंतर देशात महागाई वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरणाची घोषणा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मूळ महागाईच्या बाबतीत, सध्याच्या क्षेत्रातही हीच स्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे, जी 4 टक्क्यांच्या खाली आहे. टेलिकॉमशी संबंधित काही निर्णय आणि इतर त्यात वाढ करण्यात भूमिका बजावू शकतात. याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो. असा अंदाज आहे की, महागाई पुढील वर्षाच्या तिमाहीत 3.8 टक्के असू शकते.”

दास पुढे म्हणाले, “वर्तमानकाळात महागाई जास्त आहे. ही महागाई अन्नधान्यांच्या महागाईमुळं आहे. चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) मध्ये अन्न-धान्यांची महागाई खूप जास्त असण्याची शक्यता आहे आणि याचं संतुलन आगामी महिन्यांमध्ये अनेक घटकांवर अवलंबून आहे.”

Visit : Policenama.com