Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात कोरोना’च्या 1179 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गुरुवारी 1179 नवीन कोरोना रुग्णांचे (Coronavirus in Maharashtra) निदान झाले आहे. तर 615 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान 17 जणांचा कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 65 लाख 375 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.7 टक्के इतके झाले आहे.

 

राज्यात गेल्या 24 तासात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 392 रुग्णांचा कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या (Omycron) 23 रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 88 इतकी झाली आहे. आतापर्यंत 42 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 81 लाख 17 हजार 319 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 53 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण नमुन्यांपैकी राज्यात 9.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 7 हजार 897 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 76 हजार 373 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत तर 899 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 1179 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण ! पुण्यात सर्वाधिक13, मुंबईत 5, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे तसेच नागपूर आणि मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 नवीन रुग्ण

Honda Activa | फक्त 9 हजारांमध्ये आता मिळेल 60 kmpl मायलेजची देशातील बेस्ट सेलिंग Honda Activa ची प्रीमियम एडिशन

Prahlad Singh Patel | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी पावले उचलावी लागतील – प्रल्हाद पटेल