RBI कडून 3 मोठ्या घोषणा ! आता ‘ऑनलाइन’ मिळणार 50 लाखापर्यंतचे ‘कर्ज’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI गुरुवारी आपल्या रेपो दरात कपात केली नाही, परंतू सामान्यांची समस्या दूर करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी 3 मोठ्या घोषणा RBI ने केल्या आहेत. आरबीआयला वाटते की यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेत तेजी येईल.

ऑनलाइन मिळणार 50 लाखांचे कर्ज
आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितले की कोणतीही बँक अथवा एनबीएफसी कंपनी कोणालाही ऑनलाइन 50 लाखापर्यंतचे कर्ज देऊ शकते. पहिल्यांदा ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत होती. ती कंपन्यांसाठी 10 लाख रुपये होती. ही सुविधा फक्त पीअर टू पीअर प्लॅटफॉर्मवर मिळेल. यासाठी आरबीआयकडून लवकरच मार्गदर्शक तत्व जारी केले जातील.

लॉन्च होणार 10 हजार रुपयांचे नवे प्रीपेड कार्ड
आरबीआयने लवकरच नवे प्रीपेड कार्ड लॉन्च करण्याचा विचार करत आहे, ज्याचा वापर लोक शॉपिंग आणि अन्य दुकानांवर पेमेंट करण्यास करु शकतील. या कार्डमध्ये लोक अधिकाधिक 10 हजार रुपयांची रक्कम भरु शकतील. या बँकेत फक्त बँकेतूनच पैसे भरता येईल. किंवा रिलोड करता येईल. याचा वापर फक्त डिजिटल पद्धतीने करता येईल. यासंबंधित 31 डिसेंबरला आरबीआय मार्गदर्शक तत्व जारी करतील. हे एका मोबाइल वॉलेट प्रकारे काम करेल.

एटीएम होणार आधिक सुरक्षित
आरबीआयने बँकांना एटीएम सुरक्षा आणखी वाढवण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.  बँकांनी थर्ड पार्टी ज्या एटीएमचे सर्वर आणि स्विच अ‍ॅप्लिकेशन पाहते, त्यांच्याबरोबरच्या कराराला बदलण्यास सांगण्यात आले. यात सॉफ्टवेअरमध्ये बदल, डाटा स्टोरेज आणि एटीएमची सुरक्षेसाठी एक तंत्र विकसित केले जावे. एटीएमचे जे फ्रॉड होत आहेत, क्लोनिंगचे आणि फिशिंगचे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

आरबीआयने विकासदराच्या अंदाजात कपात केली आहे. रेपो रेट देखील 5.15 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच महागाई पाहता आरबीआयकडून काही धोरणे ठरवण्यात आली आहेत. यावर्षी जवळपास 135 आधार अंकांची कपात झाली आहे. नऊ वर्षात पहिल्यांदा रेपो रेट इतका कमी झाला आहे. 2010 नंतर हा रेपो रेट सर्वात निचांकी स्तरावर आहे. रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्के आहे तर बँक रेपो रेट 5.40 टक्के आहे.