RBI Monetary Policy | भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे पतधोरण जाहीर; महागाई कमी करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (RBI Monetary Policy) बैठक नुकतीच पार पडली. आरबीआयच्या पतधोरणाची (RBI Monetary Policy) ही बैठक 5, 6, 7 डिसेंबर या तारखेला झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 35 बीपीएसने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात वाढत चाललेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

 

या बैठकीचे मुख्य लक्ष्य महागाई नियंत्रण होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने कठोर निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक गेले अनेक दिवस रेपोरेटमध्ये सातत्याने वाढ करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मिळणारे कर्ज महागणार आहे. याबैठकीनंतर शक्तिकांत दास म्हणाले, ‘सध्या संपूर्ण जगाकडे पाहता जागतिक पातळीवर अनेक जागी अस्थिरता दिसते. रशिया आणि युक्रेन युद्धाचाही जगाला आर्थिक परिणाम भोगावा लागत आहे. जगात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा पाहायला मिळत आहे, ज्याचा परिणाम गरीब आणि आर्थिकरित्या दुर्बल घटकांना बसला आहे. त्याचबरोबर जगातील सर्व शेअर मार्केटवरही (Share Market) या सर्वांचा परिणाम झाला आहे. तसेच, वस्तूच्या विक्रीदरावर या अस्थिरतेचा मोठा परिणाम झाला आहे. सगळ्यांनाच महागाईचा मोठ्या प्रमाणावर त्रास भोगावा लागणार आहे. अद्यापही महागाई काही कमी झालेली नाही आणि ती उच्च स्तरावर आहे. त्यामुळे भारताची आत्तापर्यंतची आर्थिक गणितेही फिस्कटली आहेत. त्यातून हवामान बदलाचाही परिणाम मोठा होत आहे,’ असे सांगत त्यांनी अनेक परिणामकारक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. (RBI Monetary Policy)

अन्नधान्यांच्या किमती कमी झाल्यामुळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) व्याजदर वाढ कमी करण्याच्या विचारात आहे, असे तज्ज्ञांचे मत होते. मात्र, या वर्षीच्या जानेवारीपासून महागाईचा दर 6 टक्क्यांहून अधिक आहे. हा दर स्वीकार्य पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याचा प्रयत्न आरबीआयकडून केले जात आहेत. यावर्षीच्या सुरुवातील रेपोरेट ५ टक्के होता, पण त्यात वाढ होऊन आता तो ६.२५ टक्के झाला आहे. रेपोरेट म्हणजे भारतातील इतर बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर. भारतातील बँका सर्वसामान्यांकडून होणाऱ्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताच्या बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. त्यावर भारतीय रिझर्व्ह बँक त्यांचा व्याज आकारते. हे व्याजदर आपल्याला मिळणाऱ्या व्याजाचा दर ठरवते. जर बँकांना कमी दरात कर्ज मिळाले, तर ते आपल्याला कमी दरात कर्ज देऊ शकतात.

 

मात्र, गेले अनेक महिने भारतात महागाई ६ टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे.
ती नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्यांच्या कर्जाचे दर म्हणजे रेपोरेट वाढवला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरविलेला महागाई दर ४ टक्के असून, त्यात २ टक्क्यांची वाढ किंवा घट स्वीकार्य आहे.
म्हणजे २ ते ६ टक्क्यांच्या श्रेणीत भारताचा महागाई दर असू शकतो,
पण महागाई दर ६ टक्क्यांच्या पुढे गेल्याने रिझर्व्ह बँक तो नियंत्रणात आणत आहे.

 

Web Title :- RBI Monetary Policy meeting | rbi governor shaktikanta das announces 35 bps hike in repo rate rbi raises repo rate by 35 basis points to 6 25 percentage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी