RBI ची 4 जूनला महत्वाची बैठक ! महागाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणेची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 4) मुद्रा निती समितीची बैठक होणार आहे. बैठकीत कोरोना आणि लॉकडाऊन, वाढलेली महागाई पाहाता आरबीआय RBI मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुद्रा निती समितीच्या दर 2 महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत अर्थव्य़वस्थेत सुधारणा करण्यावर चर्चा केली जाते. तसेच व्याजदरांबाबतही निर्णय घेतला जातो. बैठकीत व्याजदर सध्याच्या स्तरावरच ठेवण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर हा 4 टक्के होता, तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के होता. कोरोनामुळे देशातील बहुतांश भागात लॉकडाऊन होता. यामुळे त्याचा अर्थव्य़वस्थेवर वाईट परिणाम दिसून आला आहे.

देशात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. या सर्वोच्च दरामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमपीसीला व्याजदर घटविण्याचा निर्णय घेणे सोपे राहणार नाही, असे पीडब्ल्यूसी इंडिया लीडरच्या रानन बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आयसीआरईच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात आर्थिक व्यवहारांबाबत काहीच स्पष्ट स्थिती समोर आली नाही. जोपर्यंत लसीकरण प्रक्रियेत मोठा बदल होत नाही, तोवर यंदाच्या मुद्रा नीतिला उदारच ठेवावे लागेल. मनी बॉक्स फायनान्स कंट्रोलर विराल श्रेष्ठ यांनी सांगितले की, महागाईची जोखिम पाहता जेथे व्याजदरांचा संबंध आहे तिथे ही नीति जैसे थे ठेवण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुरेसा कर्जपुरवठा सुरु ठेवणे गरजेचे आहे. ग्रामीण केंद्रीत आणि छोट्या एनबीएफसीसाठी काही सुविधा दिल्यास मोठी मदत होणार आहे.

Also Read This : 

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम माधुरी पवारच्या डान्सने चाहते घायाळ !

Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’

मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही त्यांना आश्वस्थ करा’