पेन्शनर्ससाठी खुशखबर ! आता पेन्शन उशिरा मिळाल्यास बँक देणार नुकसान भरपाई, RBI नं बदलला नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर सरकारी पेन्शन मिळण्यासाठी कोणाला उशीर होत असेल तर आता वर्षाला 8 % व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने सरकारी बँकांना आदेश दिले आहेत की जर एखाद्याची पेन्शन देण्यासाठी उशीर होत असेल तर त्यांना वार्षिक 8 % व्याज द्यावे लागेल.

1 ऑक्टोबर 2008 नंतरच्या सर्व पेन्शन धारकांवर हा नियम लागू होईल. पेन्शन धारकांना या सवलतीचा फायदा घेण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पेन्शन उशिरा मिळाल्यावर पेन्शन कर्त्याला वार्षिक आठ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे. याबाबत सरकारी बँकांना आदेश देण्यात आले आहेत की अधिक रक्कम वाचवण्यासाठी लवकरात लवकर बाकी असलेल्या पेन्शन देऊन टाकणे.

याबाबतची सर्व माहिती आणि मदत पेन्शन कर्त्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या ठिकाणाहून मिळू शकते. ज्यांचे वय जास्त आहे अशा सिनिअर सिटिझन्स यांची पेन्शन लवकरात लवकर देण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आलेले आहेत.

Visit – policenama.com