अर्जुन, मलायकाच्या नात्यावर सोनम नाखूष

मुंबई :वृत्तसंस्था – मलायका आणि अर्जुन यांच्या विषयी दररोज काहीतरी न्यु येत असते. कधी हे दोघे एकत्र स्पॉट होतात तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरून अशा अनेक कारणावरून बॉलिवूडपासून ते त्यांच्या चाहत्यांमध्यें गोघेही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे त्यांचेनटे कोणापासून लपून राहिले नाही. पण त्यांच्या या नात्याने सगळेच खूष नाहीत. सलमान खानची या नात्याबद्दलची नाराजी सगळ्यांसमोर आहे.पणअभिनेत्री सोनम कपूर देखील या नात्यामुळे नाखूष असल्याचं समोर आलं आहे.आणि तिला अजिबात वाटत नाही की, मलायका अरोरा तिची वहिनी बनावी.
सोनम आणि मलायकाचा वाद अतिशय जुना असून या दोघी एकमेकींशी बोलत नाही. डिझाइनर मनीष मल्होत्राच्या ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीत या दोघींची भांडण झाले होते. हा कार्यक्रम करण जोहरने होस्ट केला होता.
असं कळलं की, या पार्टीत मलायकाने खूप ड्रिंक्स केलं होतं. यावेळी सोनमने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण उलट मलायकाच सोनम कपूरवर खूप भडकली आणि नको ते बोलली. या दोघींची भांडण होत असल्याचे बघून करण आणि मनीषमध्ये आले. पण या दोघी तेव्हापासून एकमेकींशी बोलत नाहीत.
सोनम कपूरच्या या निर्णयाने कपूर कुटुंबातच दोन ग्रुप तयार झाले आहे. जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांचा या लग्नाला पूर्वीपासूनच पाठिंबा आहेत. अनिल कपूर यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त मलायका कपूर कुटुंबात सहभागी झाली होती.