Sarkari Naukri : ‘नॅशनल हाउसिंग बँके’त सरकारी नोकर्‍या, दरमहा 5 लाखांपर्यंत पगार,जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सरकारी बँकेत सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हाउसिंग बँकेने (एनएचबी) विविध स्केलमध्ये तज्ञ अधिकारी (एसओ) च्या पदांची नियमित/ कराराच्या आधारे भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. एनएचबी एसओ भरती अधिसूचनेनुसार, बँकेद्वारे ज्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये डीजीएम, एजीएम, आरएम आणि विविध विभागातील व्यवस्थापक पदे समाविष्ट आहेत. या पदांमध्ये डीजीएम पदासाठी 5 लाखांपर्यंत दर महिन्याला पगार देण्यात येईल, ज्यात ‘फिक्स्ड पे’ 3.75 लाख आणि दर महिन्याचे 1.25 लाख ‘व्हेरिएबल वेतन’ देण्यात येईल. त्याच वेळी, अन्य पदांसाठी निर्धारित वेतनमानसाठी अधिकृत सूचना पहा. डीजीएमसह विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज उद्या 8 ऑगस्ट 2020 पासून एसएचबीच्या अधिकृत संकेतस्थळावर nhb.org.in वर करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची व अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2020 निश्चित करण्यात आली आहे.

पदांनुसार रिक्त संख्या आणि पगार

– डीजीएम (चीफ रिस्क ऑफिसर) – 1 पद: पगार दरमहा 5 लाख रुपये
– एजीएम (इकॉनॉमी अँड स्ट्रॅटजी) – 1 पद: पगार दरमहा 1,23,814 रुपये
– एजीएम (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम- एमआयएस) – 1 पद: पगार दरमहा 1,23,814 रुपये
– एजीएम (एचआर) – 1 पद: पगार दरमहा 1,23,814 रुपये
– आरएम (रिस्क मॅनेजमेंट) – 1 पद: पगार दरमहा 1,02,286 रुपये
– मॅनेजर (क्रेडिट ऑडिट) – 2 पदे: पगार दरमहा, 84,384 रुपये
– मॅनेजर (लीगल) – 2 पदे: पगार दरमहा 84,384 रुपये
– मॅनेजर (इकॉनॉमी अँड स्ट्रॅटजी) – 1 पद: पगार दरमहा 84,384 रुपये
– मॅनेजर (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम – एमआयएस) – 1 पद: पगार दरमहा 84,384 रुपये

अर्जाचे शुल्क

नॅशनल हाउसिंग बँकेत (एनएचबी) तज्ञ अधिकारी (एसओ) या पदावर भरतीसाठी अर्ज करतांना उमेदवारांना 600 रुपये अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना मात्र 100 रुपये शुल्क भरावे लागेल.