OFFER ! 6 हजार रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा 3 कॅमेऱ्याचा ‘हा’ स्मार्टफोन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Xiaomi चा पॉप्युलर झालेला Redmi Note 7 Pro खुप कमी किमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. ग्राहकांना ही संधी फ्लिपकार्टवर मिळत आहे. येथून रेडमी नोट 7 प्रो 37% डिस्काउंटवर घरी आणू शकता. सूट मिळाल्यानंतर ग्राहकांला हा फोन केवळ 9,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत मिळू शकतो. ही किमत फोनच्या 4जीबी रॅम व्हेरियंटची आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेवूयात.

रेडमी नोट 7 प्रो
फोनमध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो नॉच डिझाईनसोबत येतो. फोनची सर्वात खास बाब म्हणजे त्याच्या रियर पॅनलवर Aura डिझाईन आहे, जे खुप यूनीक आणि सुंदर दिसते. याशिवाय फोनच्या दोन्ही बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे.

रेडमी नोट 7 प्रो ड्युअल कॅमेरा सेटअपसोबत येतो. यामध्ये एफ/1.79 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. यासोबत 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

लॉन्च झाला Redmi 8A Dual
मागच्या आठवड्यात शियोमी रेडमी सिरिजमध्ये नवा फोन Redmi 8A Dual अ‍ॅड केला आहे. नेहमीप्रमाणे xiaomiने या फोनला स्वस्त किमतीत जास्त फिचर्स दिले आहेत. शियोमीने रेडमी 8ए ड्युअल दोन रॅम व्हेरियंट 2 जीबी आणि 3 जीबीमध्ये लाँच केले आहे. यामध्ये 2जीबी रॅम व्हेरियंट फोनची किमत 6,499 रुपये आणि 3जीबी व्हेरियंटची किमत 6,999 रुपये आहे.

You might also like