अखेर कंगनाविरूध्द FIR दाखल, धार्मिक तेढ अन् ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाईनः – अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेता सुशातंसिह राजपूत आत्महत्या प्रकरणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्यानुसार अभिनेत्री कंगना रणौत व तिची बहिण रंगोली चंदेल यांच्या विरोधात वांद्रे पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कास्टींग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना व तिच्या बहिणीविरोधात एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. आज कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर फिर्यादी व त्याचा वकील कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन वांद्रे ठाण्यात पोहचले. एफआयआरनुसार कंगना व तिची बहिण यांनी आपल्या ट्विदद्वारे जातीय सलोखा बिघडवण्याचे आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे काम केले आहे. पोलीस या प्रकरणात प्रथम कॉपीची प्रत वाचून त्यानंतर पुरावे एकत्रित करणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न पोलीस करतील. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हणले आहे की, कंगना सतत बॉलीवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियावरून बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे.

मोहमद्द अश्रफुल्ला सय्यद नाव्याच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांतसिंह रजपूत प्रकरणावरून कंगनाने बॉलीवूूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्य केली होती. तसेच सोशल मिडियावर पोष्ट टाकून धार्मिक तेढ नर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.अशी तक्रार केली होती.