Reliance Industries | रिलायन्सने 3 वर्षात सरकारी तिजोरीत जमा केले 5 लाख कोटी; नोकऱ्या देण्यात पहिल्या क्रमांकावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries) गेल्या तीन वर्षांत 5 लाख 653 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत. ही रक्कम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, स्पेक्ट्रम वापर शुल्क आणि इतर बाबींमध्ये जमा करण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात रिलायन्सने 1.77 लाख कोटी रुपये दिले आहेत. कंपनीच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) आधी कंपनीच्या वार्षिक अहवालात हे उघड झाले आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. (Reliance Industries)

गेल्या तीन वर्षांत रिलायन्सने किती पैसे दिले याचा अंदाज यावरून काढला जातो की तो भारत सरकारच्या एकूण बजेट खर्चाच्या 5% पेक्षा जास्त आहे. मागील आर्थिक वर्षातही रिलायन्सने सरकारी तिजोरीत 1.88 लाख रुपयांचे योगदान दिले होते. रिलायन्स ही देशातील सर्वाधिक कर भरणारी कंपनी आहे. (Reliance Industries)

नोकऱ्या देण्यातही रिलायन्स पहिल्या क्रमांकावर होती. वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये,
रिलायन्सने 95,167 नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, यासह, रिलायन्समधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या
3.89 लाख झाली आहे. यापैकी, 2.45 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांसह, रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठ्या
नोकरदारांपैकी एक बनले आहे. रिलायन्स जिओमध्ये ९५ हजारांहून अधिक लोक काम करत आहेत.
रिलायन्सने हजारो नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
कोविडच्या काळातही कंपनीने 75 हजार नवीन नोकऱ्या निर्माण केल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न करणार्‍या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली? अजित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | ‘देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच…’ बानकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Political News | ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’, उद्धव ठाकरेंच्या टिकेला भाजपचे ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर