Jio युजर्ससाठी मोठी बातमी, ‘या’ पध्दतीनं वाढू शकतं दैनंदिन डेटा ‘लिमीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या युगात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना मोहित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. याच पद्धतीनं आता रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ४ डेटा व्हाउचर्स ऑफर केली आहेत जे की डेली डेटा लिमिटला वाढवण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतील.

या डेटा व्हाउचर्समध्ये खास असे काय आहे ?
कंपनीच्या ११ रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये ४०० एमबी आणि २१ रुपयांच्या डेटा व्हाउचर मध्ये १ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. याव्यतिरिक्त ५१ रुपयांच्या डेटा व्हाउचर बद्दल बघितले तर यामध्ये आपल्याला ३ जीबी डेटा आणि १०१ रुपयांच्या डेटा व्हाउचर मध्ये ६ जीबी डेटा मिळतो. यांची खास बाब म्हणजे कॉम्बो प्लॅन संपण्यापर्यंत ते व्हॅलिड राहतात.