Jio नं लॉन्च केल्या 2020 ऑफर, वर्षभर मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डाटाची सुविधा

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – जीओने नवीन वर्षासाठी एक नवी ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार कंपनी ग्राहकांना अमर्यादीत कॉलिंगसह जीओ फोनसुद्धा देणार आहे. ही ऑफर स्मार्टफोन आणि नवीन फिचर फोन असलेल्या ग्राहाकांसाठी आहे. प्लॅननुसार ग्राहकांना महिन्याला १६८ रूपये खर्च येणार आहे.

१६८ रुपये मासिक खर्च
कंपनीच्या या ऑफरनुसार ग्राहकांना ३६५ दिवसांच्या हिशेबानुसार प्रति महिना १६८ रूपये खर्च येणार आहे. ही ऑफर आजपासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ग्राहकांना याचा लाभ घेण्यासाठी २०२० रूपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

दोन प्लॅन सुरू
कंपनीने दोन प्लॅन लाँच केले आहेत. पहिला प्लॅन जीओ स्मार्टफोन धारकांसाठी आहे. दुसरा प्लॅन जीओ फिचरचा वापर करणारांसाठी आहे. अशा ग्राहकांना २०२० रूपयांचे रिचार्ज केल्यानंतर एक जीओ फोन मिळणार आहे. यासह अनलिमिटेड कॉलिंग, ०.५ जीबी डाटा प्रति दिवस, जीयो अ‍ॅप्स आणि एसएमएस १२ महिन्यांसाठी मिळणार आहेत.

दुसऱ्यांदा लाँच केले १४९ आणि ९८ रूपयांचे प्लॅन
रिलायन्स जीओने ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी १४९ आणि ९८ रूपयांचे प्लॅन पुन्हा सुरू केले आहेत. १४९ चा प्लॅन जीओने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरू केला आहे. ग्राहकांना या प्लॅनमधून प्रतिदिवस १ जीबी डाटा मिळणार आहे. तसेच ग्राहकांना जीयो-टू-जीयो नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलची सुविधा असणार आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्सला ३०० एफयूपी मिनिट मिळणार आहेत. याशिवाय यूजर्स रिलायन्स अ‍ॅपसुद्धा मोफत वापरू शकणार आहेत. या पॅकची वैधता २४ दिवसांची असणार आहे.

९८ रुपयांचा प्लॅन
जीओच्या ग्राहकांना या पॅकमध्ये २ जीबी डाटा आणि १०० एसएमएस मिळतील. तसेच जीओ टू जीओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करता येतील. परंतु, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी आययूसी चार्ज लागणार आहे. या आययूसी चार्जचे सुरूवातीचे व्हाऊचर १० रूपये आहे. प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/