Reliance Jio | महाराष्ट्रामद्धे पुन्हा एकदा रिलायन्स जिओ अव्वल, जानेवारी महिन्यात 1.39 लाख नविन ग्राहकांची भर – ट्राय

पोलीसनामा ऑनलाइन –Reliance Jio | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय ने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार जानेवारी 2024 मध्ये रिलायन्स जिओने महाराष्ट्रामध्ये 1.39 लाख ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. भारती एअरटेल ने नाममात्र 68 हजार नवीण ग्राहकांची भर घातली. रिलायन्स जिओ 43.22 दशलक्ष ग्राहकांसह महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.

देशातील दिग्गज कंपनी व्होडा आयडिया म्हणजेच Vi ने जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा तोटा सहन करावा लागला असून 3 लाख ग्राहकांनी व्होडा आयडिया चे नेटवर्क सोडले आहे. बीएसएनएल ने मात्र 22 हजार नवीन ग्राहकांची भर घातली आहे. सुमारे 22.60 दशलक्ष वापरकर्त्यांसह व्ही बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेल 21.60 दशलक्ष यूजर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Reliance Jio)

वायरलेस सब्सक्राइबर अर्थात महाराष्ट्रातील कस्टमर मार्केट शेअर मध्ये सुद्धा जीओ अव्वल असून रिलायन्स जिओ 46.32 टक्के ग्राहकांसह पहिल्या स्थानावर आहे .व्होडाआयडिया 24.23 % मार्केट शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारती एअरटेल 23.12 % मार्केट शेअर सह तिसऱ्या स्थानावर आहे. बीएसएनएल मात्र 6.30 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

2023 मध्ये जीओ ने जवळ जवळ प्रत्येक महिन्यात सातत्याने ग्राहकांची भर घातली असून
जिओच्या 5G सेवेला सुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नुकत्याच उकला या संस्थने केलेल्या पाहणीनुसार जिओमुळे आज भारत 5g उप्लबधे साठी जगात पहिल्या 15 देशांमध्ये गणला गेला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका