Reliance Jio युजर्सना मिळणार Disney+ Hotstar चे ‘फ्री’ सब्सक्रिप्शन, कंपनीनं जारी केला टीझर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावेळीही आपल्या वापरकर्त्यांसाठी खूप खास भेट घेऊन येणार आहे. कंपनीने टीझरच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. रिलायन्स जिओ लवकरच आपल्या वापरकर्त्यांना Disney+ Hotstar VIP ची एक वर्षाची विनामूल्य सदस्यता देणार आहे. यानंतर, वापरकर्ते Disney+ Hotstar VIP वर चित्रपट आणि टीव्हीचा आनंद घेण्यास सक्षम असतील.

रिलायन्स जिओने एक टीझर जारी केले आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की ‘एका वर्षासाठी Disney+ Hotstar VIPची सदस्यता घेण्यास तयार व्हा’. दरम्यान, हे स्बक्रिप्शन कधी सुरू होईल, हे उघड झाले नाही, टीझरमध्ये केवळ कमिंग सूनच लिहिले आहे. परंतु अशी अपेक्षा आहे की, कंपनी येत्या काही दिवसांत ही घोषणा करू शकेल आणि वापरकर्त्यांना यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना हॉटस्टारचे स्बक्रिप्शन प्रदान करण्याची ही पहिली वेळ नाही. परंतु यावेळी कंपनी आपल्या वापरकर्त्यांना एक वर्षासाठी Disney+ Hotstar VIP विनामूल्य सदस्यता देणार आहे आणि कारण बॉलिवूडमधील अनेक चित्रपट लवकरच या अ‍ॅपमध्ये प्रीमियर होणार आहेत.

Disney+ Hotstar VIP बद्दल बोलायचे झाल्यास सदस्यता मिळाल्यानंतर वापरकर्ते चित्रपट, किड्स कन्टेन्ट, हॉटस्टार स्पेशन, न्यूज आणि क्रिकेट सामने पाहण्यास सक्षम असतील. या अ‍ॅपमध्ये आपल्याला लाईव्ह मॅच पाहण्याची सुविधा मिळेल. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट केले गेले नाही की, रिलायन्स जिओच्या कोणत्या योजनांमध्ये Disney+ Hotstar VIP स्बक्रिप्शन उपलब्ध असेल. परंतु त्याचा फायदा केवळ निवडक योजनांच होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. तसे, Disney+ Hotstar VIP साठी स्वतंत्रपणे स्बक्रिप्शन घेण्यासाठी आपल्याला वार्षिक 399 रुपये द्यावे लागतील.