Jio Vs Airtel : 249 रूपयात अनलिमिटेड कॉल आणि डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जीओकडे ग्राहकांना देण्यासाठी २४ दिवसांपासून १ वर्षांपर्यंत वैधता असलेले प्रीपेड प्लॅन्स आहेत. १२९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये आणि २४९ रुपयांचे स्वस्त प्लॅन्स देखील जीओकडे आहेत. आता एअरटेलने सुद्धा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे जो जीओला टक्कर देतोय. चला तर मग जाणून घेऊया एअरटेल आणि जिओच्या प्रीपेड प्लॅन्सची खासियत.

२४९ रुपयांचा जीओचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा ऑफर होतो. एकूण ५६ जीबी डेटा २८ दिवसांना मिळतो. रोज डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती ६४4Kbps होते. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉल आणि इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार मिनिट्स प्राप्त होतात. तद्वतच, रोज १०० एसएमएस फ्री मिळतात. जिओ अ‍ॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

२४९ रुपयांचा एअरटेलचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. यात एअरटेल आणि आणि अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तद्वतच, ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळतात. रिचार्ज पॅकमध्ये एक्स्ट्रिम प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री मिळते. हेलोट्यून्स, विंक म्यूझिक आणि १ वर्षासाठी शॉ अकादमी फ्री ऑनलाइन कोर्स मिळतो. फास्टॅगवर १५० रुपयांचा कॅशबॅक देखील देण्यात आला आहे.