Reliance Retail | रिलायन्स रिटेल भारतात ‘7-इलेवन स्टोअर्स’ चालवणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Reliance Retail | रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड Reliance Retail (RRVL) ने गुरुवारी जाहीर केले की, 7-Eleven, Inc (SEI) सोबत देशात सेव्हन-इलेव्हन स्टोअर चालवण्यासाठी मास्टर फ्रेंचायझी करार केला आहे. हा करार 7-इंडिया कन्व्हेनिअन्स रिटेल लिमिटेड, RRVL ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आणि 7-Eleven, Inc. (SEI) यांच्यात आहे. पहिले सेव्हन-इलेव्हन स्टोअर शनिवारी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये उघडणार आहे. त्यानंतर बृहन्मुंबईतील प्रमुख व्यावसायिक आणि निवासी भागात स्टोअर्स वेगाने उघडण्यात येतील.

करारावर भाष्य करताना, आरआरव्हीएलच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या: “रिलायन्समध्ये, आम्हाला आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम देत असल्याचा अभिमान आहे आणि भारतात सेव्हन-इलेव्हन जागतिक दर्जाचे आणि विश्वासार्ह सुविधा स्टोअर लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. सेव्हन -एलेव्हन किरकोळ क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित जागतिक ब्रँडपैकी एक आहे. SEI च्या सहकार्याने आम्ही नवीन शॉप्स लाँच करून भारतीय ग्राहकांना त्यांच्या शेजारच्या भागात अधिक सोयीस्कर पर्याय प्रदान करणार आहोत.”

जगभरातील रिटेल चेन (Reliance Retail) भारतीय बाजारपेठांमध्ये पाय रोवण्यास उत्सुक आहेत आणि रिलायन्स रिटेल त्यांची पहिली पसंती म्हणून उदयास आली आहे. मार्क्स अँड स्पेन्सर, व्हिजन एक्सप्रेस, बर्बेरी, पॉल अँड शार्क, थॉमस पिंक, डिझेल आणि बॉस सारख्या अनेक प्रीमियम ब्रँडने रिलायन्ससोबत भागीदारी केली आहे. सेव्हन-इलेव्हन स्टोअर्स सुरू झाल्यावर, देशातील सर्वात मोठा रिटेलर म्हणून RRVL ने भारतीय ग्राहकांना मनसोक्त खरेदीचा अनुभव आणि आकर्षक मूल्य देण्यासाठी आपल्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकले आहे.

RRVL ने एका निवेदनात म्हटले आहे की, “सेव्हन-इलेव्हन स्टोअर्सचा हेतू दुकानदारांना एक अनोखी शैली प्रदान करणे,
विविध प्रकारचे पेय, स्नॅक्स आणि स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध करून देने जे स्थानिक चवीने परिपूर्ण असतील शिवाय परवडणारे आणि आरोग्यदायी देखील असतील.
आमची विस्तार योजना तयार असून सेव्हन इलेव्हन inc, RRVL ला भारतातील सेव्हन इलेव्हन रिटेल बिझनेस मॉडेलची अंमलबजावणी
आणि स्थानिकीकरण करण्यात मदत करेल.

RRVL ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे आणि RIL ग्रुप अंतर्गत सर्व किरकोळ कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे.
31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षासाठी त्याचा 1,57,629 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय होता.
अमेरिकन कंपनी SEI इरविंग, टेक्सास येथे स्थित आहे, त्यांचे 18 देश आणि प्रदेशांमध्ये 77,000 पेक्षा जास्त स्टोअर आहेत.
कंपनीची केवळ उत्तर अमेरिकेत 16,000 स्टोअर्स आहेत.

Web Title :- Reliance Retail | reliance retail ventures limited to launch 7 eleven stores in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडले

Fuel – Gas Prices | महागाईचा भडका ! इंधनासह स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ

Supreme Court | केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र, NDA नंतर RIMC आणि RMS मध्ये सुद्धा मुलींना मिळणार प्रवेश