रिलायन्सची Amazon, Flipkart ला ‘आव्हान’, ऑनलाईन शॉपिंगसाठी लाँच केलं JioMart

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)ने वेगाने वाढणार्‍या भारतीय ई-कॉमर्स व्यवसायात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या जागतिक दर्जाच्या कंपन्यांना आव्हान दिले आहे. रिलायन्स रिटेलने जियो टेलिकॉम वापरकर्त्यांना सोमवारी आपल्या नवीन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म JioMart मध्ये नोंदणीसाठी आमंत्रण पाठविणे सुरू केले आहे.

कोठे झाली सुरुवात :
स्वत: ला ‘देशाचे नवीन दुकान’ म्हणवणारे जिओमार्ट सध्या मुंबईतील नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात सेवा देणार आहे. मुकेश अंबानी यांनी यावर्षी 12 ऑगस्ट रोजी कंपनीच्या एजीएममध्ये सांगितले की, रिलायन्स रिटेल या नव्या किरकोळ उद्योगातून ३ कोटी लहान दुकानदारांशी संपर्क साधेल. रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्याने सांगितले कि, ‘आम्ही त्याची सॉफ्ट लॉन्चिंग केली आहे. सर्व Jio वापरकर्त्यांना नोंदणी करण्यासाठी आणि प्रारंभिक सूट मिळण्याची ऑफर दिली जात आहे. जरी हे सध्या तीन क्षेत्रात आहे, परंतु त्याचा विस्तार वाढविण्यात येणार आहे. जिओमार्ट अ‍ॅप लवकरच सुरू होईल.

काय आहे योजना :
दरम्यान, कंपनीने यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेले नाही. जिओमार्ट ग्राहकांना 50,000 हून अधिक किराणा उत्पादनांची मोफत होम डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे आणि यासाठी कोणतेही कमीतकमी ऑर्डर मूल्य नाही. तसेच कोणतेही प्रश्न न विचारता डिलिव्हरी रिटर्न आणि एक्स्प्रेस वितरण देखील देण्यात आले आहे. रिलायन्स रिटेलच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने व्यवसाय केले जातील आणि हे सर्व उत्पादक, व्यापारी, छोटे दुकानदार, ब्रँड आणि ग्राहकांना जोडेल. कंपनी सुमारे दोन वर्षांपासून त्याच्या योजनेवर काम करत होती. सध्या, रिलायन्स रिटेलद्वारे नेबरहूड स्टोअर्स, सुपरमार्केट्स, हायपर मार्केट्स इत्यादीचे संचालन केले जाते.

महत्वाचे म्हणजे, कंपनी दररोजच्या वस्तू जसे की साबण, शैम्पू आणि घरातील इतर वस्तूंच्या विक्रीवर भर देत आहे. ही कंपनी स्थानिक दुकानदारांना ऑनलाईन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहे, हे एक असे व्यावसायिक मॉडेल आहे, जी चीनची आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड स्वीकारत आहे. यात, ग्राहकांना ऑनलाइन उत्पादने शोधण्याचा आणि ते भौतिक दुकानातून खरेदी करण्याचा पर्याय मिळतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/