घर खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! किमती 5 ते 7 टक्क्यांनी होणार कमी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुद्रांक शुल्कात राज्य सरकारनं सवलत दिल्यानंतर आता विकासकांनी देखील गृह खरेदीदारांना उर्वरीत मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नरेडकोच्या पश्चिम विभागातील सदस्य असलेल्या विकासकांनी तशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर उर्वरीत विकासकदेखील या धोरणाचा स्विकार करण्याच्या मार्गावर आहेत. यामुळं आता घरांच्या किंमती 5 ते 7 टक्क्यांनी कमी होतील.

कोरोनामुळं ठप्प झालेल्या गृह खरेदीला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं डिसेंबर अखेरपर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के तर मार्च 2021 या कालावधीत 2 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मुंबई वगळता महाराष्ट्रातील पालिका आणि नगरपालिका हद्दीत घरांच्या खरेदीवर आकारला जाणारा एक टक्का अधिभारही आता रद्द झाला आहे. मेट्रो सेस मार्च 2020 मध्येच रद्द करण्यात आला होता. त्यामुळं ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंतच्या घरांच्या खरेदी विक्रीसाठी आकारल्या जाणाऱ्या 5 ते 7 टक्के मुद्रांका शुल्काची रक्कम 2 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सरकारनं सवलत दिल्यानंतर आता घरांच्या किंमती कमी करण्यासाठी हा शिल्लक 2 टक्के मुद्रांक शुल्काचा भार ग्राहकांच्या माथ्यावर न टाकण्याचा निर्णय नरेडकोनं घेतला आहे. पुढील 2 महिना हे शुल्क विकासकांकडून अदा केले जाईल.

सध्या राज्यातील सुमारे 1000 गृह प्रकल्पांमधे तशी सवलत दिली जात असल्यानं गृह व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारनं पुरस्कृत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिल (नरेडको)नं सांगितलं.

सुरूर होणार अर्थचक्र

बांधकाम क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. जर गृह खरेदीला चालना मिळाली तर त्यावर अवलंबून असलेल्या 269 पूरक व्यवसायांचे अर्थचक्रसुद्ध सुरू होईल असं नरेडकोच्या अशोक मोहन यांनी सांगितलं.