17 ऑगस्टला ‘सिंह’ राशीत असेल ‘बुधा’चे गोचर, जाणून घ्या 12 राशींवर कसा पडणार ‘प्रभाव’

पोलीसनामा ऑनलाईन : बुधाचे गोचर 17 ऑगस्ट 2020 ला 8 वाजून 18 मिनिटांनी कर्क मधून सिंह राशीत होईल आणि या राशीत बुध ग्रह 2 सप्टेंबर 2020, 11 वाजून 52 मिनिटांपर्यंत राहील. बुधाच्या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुधाला ज्योतिष शास्त्रात युवराजचा दर्जा देण्यात आला आहे.

बुध ग्रह व्यवसाय, वाणी, शिक्षण इत्यादीचा कारक मानला जातो. ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे की, यास तटस्थ ग्रहसुद्धा म्हटले जाते, कारण ज्या ग्रहाशी हा युती करतो, त्याच्यासारखेच फळ देण्यास सुरूवात करतो. कुंडलीत जर बुध ग्रह मजबूत अवस्थेत असेल तर तो तुम्हाला तार्किक बुद्धी, गणिती विषयांत चागली समज आणि चांगला व्यवसायिक बनवतो. जर बुध कुंडलीत अशुभ असेल तर त्वचा विकार होऊ शकतात. अशी व्यक्ती आपले म्हणणे स्पष्टपणे लोकांसमोर मांडू शकत नाही. बुधाच्या सिंह राशितील गोचरचा सर्व 12 राशींवरील प्रभाव जाणून घेवूयात…

मेष
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीत पंचम भावात होईल. या भावातून बुद्धी, संतती, ज्ञान, इत्यादीबाबत विचार केला जातो. हे गोचर त्या जातकांसाठी अति शुभ आहे जे आपल्या रचनात्मक कौशल्याने आपला व्यवसाय बदलू इच्छितात. कौटुंबिक जीवन ठिक राहील, परंतु संततीला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही चिंतीत होऊ शकता. मात्र, तुमचे आरोग्य खुप चांगले राहील. प्रेम जीवनात लवमेटसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद निर्माण होऊ शकतात.

वृषभ
वृषभ राशिच्या जातकांच्या चतुर्थ भावात बुद्धीची देवता बुधाचे गोचर होईल. या गोचरमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात शुभफळ प्राप्त होईल. या भावातून माता, घर, सुख-सुविधा यांच्याबाबत सुद्धा विचार केला जातो. या गोचरमुळे तुमच्या मातेसाठी सुद्धा शुभफळांची प्राप्ती होऊ शकते. व्यवस्थापनाशी संबंधीत क्षेत्रात अभ्यास करणार्‍यांना मनासारखा लाभ होईल. प्राथमिक शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. नोकरदारांना चांगले फळ मिळेल. कामाचे कौतूक होईल.

मिथुन
बुध देव तुमच्या राशित तृतीय भावात गोचर करतील. या भावातून धाडस, पराक्रम, छोट्या बहिण-भावांशी तुमचे संबंध, छोटे प्रवास इत्यादी बाबत विचार केला जातो. बुध हा भ्रमण, संवाद कौशल्याचा ग्रह मानला जात असल्याने या गोचर दरम्यान तुम्ही तुमच्या वाणीने लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. या राशिच्या जातकांसाठी प्रवास करणे सुद्धा शुभ ठरेल. जर कामानिमित्त प्रवास करणार असाल तर फायदा होईल. नोकरदारांसाठी चांगला काळ आहे, परंतु अंहकारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कर्क
कर्क राशीच्या जातकांच्या द्वितीय भावात बुध राशीचे गोचर होईल. हा भाव तुमची संपत्ती, कुटुंब, वाणी, उद्देश इत्यादीबाबत माहिती देतो. या गोचरच्या दरम्यान काही कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील एखाद्या सदस्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. अशावेळी जास्त चिंता करण्यापेक्षा त्या सदस्याची जास्त काळजी घ्या. या गोचरदरम्यान आर्थिक बाजू सुद्धा कमजोर राहू शकते. उत्पन्नाची जी तुम्हाला अपेक्षा आहे ते कदाचित या महिन्यात मिळू शकणार नाही.

सिंह
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या लग्न भावात होईल. लग्न भावातून व्यक्तिमत्व, आत्मा, शरीर, आरोग्य, चरित्र, बुद्धी इत्यादीचा विचार केला जातो. या भावातील बुधाच्या गोचरमुळे शुभफळ मिळेल. महत्वकांक्षा वाढतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खुप अनुकूल आहे, नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. या राशीचे जे जातक आपले शिक्षण वाढवण्यास इच्छूक आहेत त्यांच्यासाठी हा काळा चांगला आहे. परिस्थिती आणि विषय समजून घेण्याची तुमची क्षमता या काळात वाढेल. जर तुम्ही एखादे रचनात्मक कार्य जसे की- गायन, वादन, नृत्य करत असाल तर या काळात अत्यंत प्रगल्भता दिसून येईल.

कन्या
पृथ्वी तत्वाची रास कन्येच्या जातकांसाठी बुध ग्रहाचे गोचर तुमच्या द्वादश भावात होईल. हा भाव हानी, अनावश्यक खर्च इत्यादीचा आहे. बुधाच्या या गोचरच्या दरम्यान कन्या राशीच्या जातकांना खुप सांभाळून राहण्याची गरज आहे. वाईट बोलणे टाळा आणि वाईट संगतीपासून दूर राहा. वाईट संगत मिळाल्यास मोठ्या समस्येत अडकू शकता. या काळात आत्मविश्वासाची सुद्धा कमतरता जाणवेल. आत्मबल वाढवण्यासाठी योग-ध्यान याचा आधार घ्या. नोकरदार आणि व्यवसयिक लोकांसाठी बुधाचे हे गोचर आव्हानात्मक असेल.

तुळ
तुळ राशीच्या जातकांच्या एकादश भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. या भावाला लाभ भावसुद्धा म्हटले जाते. या भावातून इच्छा, मित्र, इत्यादीबाबत विचार केला जातो. तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे गोचर अनेक भेटी घेऊन येईल. जर तुम्ही आयात-निर्यात संबंधी काम किंवा बिझनेस करत असाल तर या काळात तुमची पाचही बोटं तूपात असतील. तुमच्या इच्छा या काळात पूर्ण होतील. या राशीच्या अनेक जातकांना आपल्या पित्याकडून तसेच सरकारकडून अनेक लाभांची प्राप्ती होईल. वडीलांचे सहकार्य अनेक समस्यांतून तुम्हाला वाचवू शकते.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या जातकांच्या दशम भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. या भावातून तुमच्या कर्माबाबत विचार केला जातो. आणि सोबतच याच्यामुळे कार्यक्षेत्र, नेतृत्व गुण, सन्मान, यश इत्यादीबाबत सुद्धा विचार केला जातो. वृश्चिक राशीच्या त्या लोकांसाठी बुधाचे गोचर खुप चांगले असेल जे अशा एखाद्या व्यवसायात असतील ज्यामध्ये पब्लिक डीलिंग होते. यासोबतच राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी सुद्धा हा चांगला काळ आहे, आपल्या वाणीच्या बळावर तुम्ही लोकांना आकर्षित करू शकता. तसेच या राशीच्या जातकांच्या आर्थिक बाजूचा विचार केला तर यामध्ये सुधारणा होईल, शेयर मार्केटमध्ये पैसे लावत असाल तर या दरम्यान नफा कमावू शकता. नोकरदार आणि व्यावसायिकांना अनुकूल फळ मिळेल, मात्र नोकारदारांनी वरिष्ठांशी वाद घालण्यापासून दूर राहावे.

धनु
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीच्या नवम भावात होईल. या भावाला धर्म आणि भाग्याचे स्थान म्हटले जाते. या भावात बुधाच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक क्षेत्रात लाभाची प्राप्ती होऊ शकते. तुमची रखडलेली कामे या काळात मार्गी लागतील. ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवनात जर अन्य सदस्याशी मतभेद असतील तर या काळात ते दूर होतील, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात शांतता राहील. आई-वडिलांसोबत संबंध अधिक दृढ होतील. नोकरदारांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षत्रात आपले वागणे चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. बुधाच्या नवम भावातील गोचरमुळे तुमच्या धार्मिक प्रवृत्तीत कमतरता येऊ शकते, जे तुमच्या व्यवहारिक गुणाच्या विपरित आहे.

मकर
शनी स्वामी असलेल्या मकर राशीच्या जातकांच्या अष्टम भावात बुधग्रहाचे गोचर होईल. या भावाला आयुर भावसुद्धा म्हटले जाते आणि यामुळे जीवनात येणार्‍या अडचणी, शोध, दुर्घटना इत्यादीच्या बाबतीत विचार केला जातो. या भावातील बुध गोचर त्या जातकांसाठी चांगले असेल जे संशोधन करत आहेत. तसेच काही लोकांचे मन हे तंत्र-मंत्रासारख्या गुढ विद्या शिकण्याकडेही या काळात आकर्षित होऊ शकते. मात्र, अशा विद्या तुम्ही खुप विचारपूर्वक शिकल्या पाहिजेत. तर नोकरी आणि व्यापरात या काळात शत्रूंपासून खुप सावध राहावे लागेल. शत्रू या काळात सक्रिय राहू शकतो. आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ
वायु तत्वाची रास कुंभच्या जातकांसाठी बुध ग्रहाचे गोचर सप्तम भावात होईल. हा भाव विवाह आणि जीवनात होणारी भागीदारी दर्शवतो. बुधाच्या गोचर दरम्यान तुम्ही काही नवीन लोकांशी जोडले जाऊ शकता आणि त्यांच्याकडून काही नवी गोष्टी शिकू शकता. या राशीचे जे जातक कामानिमित्त प्रवास करतील त्यांना या काळात शुभफळ प्राप्त होईल. नोकरदार लोकांना हा काळ संमिश्र राहील. परंतु जे लोक भागीदारीत व्यापार करत आहेत, त्यांच्या जीवनात अडचणी येऊ शकतात. भागीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, यासाठी स्पष्ट बोलून त्यावर मार्ग काढा. वागण्यात घाईगडबड याकाळात दिसू शकते, ज्यामुळे तुमची अनेक कामे बिघडू शकतात.

मीन
मीन राशीच्या जातकांसाठी बुधचे गोचर त्यांच्या षष्ठम भावात होईल. षष्ठम भावास रिपू भावसुद्धा म्हटले जाते आणि यातून कर्ज, वाद, अभाव, दुखापत, बदनामी इत्यादी बाबात विचार केला जातो. षष्ठम भावात बुध ग्रहाचे गोचर असताना आई-वडीलांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्यांना काही त्रास असेल तर तोबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्रीसाठी वेळ चांगली आहे. या राशीच्या नोकरदारांसाठी गोचरचा हा काळ शुभ फळ देणारा आहे. व्यापरी वर्गाने या दरम्यान खुप सांभाळून व्यवहार करावेत, तसेच विचारपूर्वक निर्णय घ्यावेत अन्यथा नुकसान होऊ शकते. या राशीच्या जातकांनी विचार केल्याशिवाय गुंतवणूक करू नये. मीन राशीचे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना यश मिळू शकते.

डिस्क्लेमर –
’या लेखातील कोणतीही माहिती/साहित्य/गणनेतील अचूकता किंवा विश्वसनीयतेची गॅरंटी नाही. विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथांतून संग्रहित करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती पोहचवणे आहे, याचा उपयोग करणार्‍यांनी केवळ माहिती म्हणून घ्यावे. तसेच यापेक्षा याच्या कोणत्याही उपयोगाची जबाबदारी स्वत: उपयोगकर्त्याची राहील.