पतीला ATM कार्ड देणे पडले महागात, महिलेने गमावले 25 हजार रुपये

पोलीसनामा ऑनलाईन – बँका सुरक्षेचा उपाय़ म्हणून आपल्या एटीएमचा पिन ( Pin Shared) ओटीपी आणि अन्य माहिती कोणाला देऊ नका असे मेसेज वारंवार पाठवतात. मात्र, आपण भाऊ, बहीण, पती, पत्नी यांना आपला पिन सांगतो. कारण बऱ्याचदा आपल्याला पैसे काढणे जमणारे नसते. बँकांचा हा नियम पती-पत्नीच्या नात्यालाही लागू होतो. कारण या नियमामध्ये कोणासोबत शेअर करू नका, असे स्पष्ट म्हटले आहे. पण अनेकवेळा पत्नीचे एटीएम कार्ड वापरून पती पैसे काढतात. आपल्या पत्नीचेच तर आहे, त्यात काय एवढे असा त्यांचा समज असतो. परंतू स्टेट बँकेने पतीला पत्नीचे एटीएम वापरता येणार नाही, असे सांगितले आहे.

पती, मित्र किंवा जवळचा नातेवाईक यापैकी कोणालाही एटीएम वापरण्यास दिल्यास तरी ते महागात पडू शकते. ते कसे पहा. 2013 मधील हे प्रकरण असून हा प्रकार बंगळूरूमध्ये घडला आहे. येथील एक महिला गरोदर होती. त्यामुळे ती मॅटर्निटी लिव्हवर होती. तिने तिचे एटीएम कार्ड नव-याला दिले होते. जे हस्तांतरण करणे बेकायदा होते. दोघांनाही याची माहिती नव्हती. महिलेचे नाव वंदना आहे. तिने स्थानिक एटीएम सेंटरमधून 25000 हजार रुपये (woman-loses-25000) काढण्यासाठी तीचे एटीएम पतीला दिले होते. पती पैसे काढायला गेला असता त्याला पैसे आल्याची स्लीप आली. परंतू पैसे आले नाहीत. तसेच खात्यातून पैसेही वजा झाले होते. तसे पाहिले तर हा एटीएमचा दोष नव्हता.

म्हणून तिचा पती राजेशकुमारने एसबीआय कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. त्याने पैसे 24 तासात खात्यात जमा होतील, असे सांगितले. मात्र पैसे काही जमा झाले नाहीत. त्यानंतर राजेशकुमारे एसबीयच्या हेलिकॉप्टर डिव्हजन ब्रॅंचकडे तक्रार केली, असता बॅंकेने खातेदाराला पैसे देण्यास नकार दिले. यासाठी कारण जे दिले ते सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. बॅंकेने दिलेले एटीएम खातेदाराशिवाय कोणीही वापरायचे नाही. खातेदाराने कोणालाही पीन द्यायचा नाही. हे एटीएम कार्ड खातेदाराशिवाय अन्य व्यक्तीने वापरले आहे.

त्यामुळे आम्ही त्यास जबाबदार नसून क्लेम रिक्वेस्ट फेटाळत असल्याचे बॅंकेने (-bi-denied-claim) म्हटले आहे. यानंतर वंदना यांनी माहिती अधिकाराचा वापर केला. तपासणीमध्ये त्या दिवशीची रक्कम 25, 000 रुपयापेक्षा अधिक होती. ग्राहक न्यायालयात गेले तरी बॅकेने पुन्हा तीला पैसे देण्यास नकार दिला. कारण एकच Pin Shared, Case closed. यानंतर वंदना साडेतीन वर्ष न्यायालयात लढत होती. तिथेही तिच्या पदरी निराशा आली. न्यायालयाने सांगितले की पतीला पैसे काढायचे असेल तर पत्नीने त्याला सेल्फ चेक किंवा ऑथोरायझेशन लेटर द्यावे.