RBI चं पत धोरण जाहीर, व्याज दराबाबत केली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज (गुरुवार) ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठीचे पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. बँकेने रोपो रेट आहेत तसाच म्हणजे 4 टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रोपो रेट देखील आहे तितकाच 3.3 टक्के इतका ठेवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाऊनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात 1.15 टक्के इतकी कपात केली होती.

कोरोना विषाणूमुळे होणारे अर्थव्यवस्थेचे नुकसान रोखण्यासाठी आणि लॉकडाऊना परिणाम कमी करण्यासाठी आरबीआयकडून सतत उपाययोजना केल्या जात आहेत. याआधी पतधोरण आढाव्याची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती. त्यामध्ये रोपो दरात 1.15 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. जून महिन्यात वाढलेल्या माहागाईचा दर विचार घेता आरबीआयकडून यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मार्चमध्ये महागाईचा दर 5.84 टक्के होता तो वाढून 6.09 टक्क्यांवर पोहचला होता.

शक्तीकांत दास यांनी सांगितले. देशात आर्थिक सुधारणा सुरु झाली आहे. विदेशी चलन साठा वेगाने वाढत असल्याची माहिती दास यांनी दिली. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जानेवारी ते जून या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती प्रचंड खराब होती असे दास यांनी म्हटले आहे.

पुढील वर्षी GDP नकारात्मक
आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबर महिन्यात त्याच घट होऊ शकते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जीडीपी ग्रोथ निगेटिव्ह होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.