धिप्पाड ‘बाहुबली’ बरोबर दिसणार नाजूक ‘सुमन’, अभिनेत्री भाग्यश्री करतीय Comeback

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन  –  टीव्हीच्या प्रेक्षकांना पुन्हा 90च्या दशकात घेऊन जाणाऱ्या मालिका पुन्हा सुरू झाल्या आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. कितीही नव्या गोष्टी, तंत्रज्ञान आलं तरीही ‘जुनं ते सोनं’ हेच जणू या लॉकडाउनच्या निमित्ताने प्रेक्षकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच 90 च्या दशकात आपल्या नाजूक दिसण्याने आणि सुशील वागणुकीने लाखो तरुणांच्या मनांवर राज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी आता परत चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. माधुरी दीक्षितला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या भाग्यश्रीने 1989 मध्ये सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात काम केलं होतं.

तो चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. मुख्य अभिनेत्री सुमनची भूमिका तिने साकारली होती. पण तिने त्यानंतर चित्रपटांत काम केलं नाही. आता बाहुबली फेम प्रभास सोबत आपण एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून त्या चित्रपटाचं नाव अजून निश्चित नसल्याचं तिनी एका वेबसाइटला सांगितलं आहे. लॉकडाउन संपल्यावरच सिनेरसिकांना भाग्यश्रीचा सिनेमा पाहता येईल.