Republic Day Parade | यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड अर्धा तास उशिराने होणार सुरू, इतिहासात पहिल्यांदा असे होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Republic Day Parade | यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day parade) अर्धातास उशिराने सुरू होईल. कोरोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेमुळे परेड सुरू होण्यास उशीर होईल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रथमच असे होणार आहे, असे ‘अमर उजाला’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे (Republic Day parade will start half an hour late).

 

दुसरीकडे गाजीपुर फुल बाजारात आयईडी( बॉम्ब) मिळाल्याने (discovered IED (bomb) in Ghazipur flower market) प्रजासत्ताक दिनाच्या परेडबाबत सुरक्षा एजन्सीज (security agencies) ची झोप उडाली आहे. स्थिती अशी आहे की, परेड रूटची बॉम्बविरोधी पथकाकडून दिवसातून चार वेळा तपासणी केली जात आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्था खुपच कडेकोट करण्यात आली आहे.

 

नवी दिल्ली जिल्ह्याच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, स्वातंत्र्याच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी परेड अर्धातास उशीरा सुरू होईल. दरवर्षी परेड सकाळी 10 वाजता सुरू होते, परंतु यावेळी साडेदहा वाजता सुरू होईल. चित्ररथ लाल किल्ल्यापर्यंत जातील, तर पथके नॅशनल स्टेडियमवरच थांबतील. (Republic Day Parade)

पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, यावेळी कोरोना प्रोटोकाल व श्रद्धांजली सभेमुळे परेड उशीराने सुरू होईल. सध्या परेडचा जो सराव सुरू आहे त्यामध्ये सुद्धा कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.

 

चित्ररथ आणि पथकांमध्ये सहभागी जवान आणि कलाकारांना कुणालाही भेटू दिले जात नाही आणि त्यांच्या जवळही कुणाला जाऊ दिले जात नाही.
ते बसमधून येतात आणि सरावात सहभागी होऊन परत बसने जातात.
याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये शहिद झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांना इंडिया गेटवर श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यामुळे परेड उशीरा होईल.

 

दुसरीकडे गाजीपुर फूलमंडीमध्ये आयईडी सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची यावेळी झोप उडाली आहे.
दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राजपथ आणि परेड मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
परेड मार्ग आणि राजपथ आदी ठिकाणी बॉम्ब निकामी पथकाकडून सतत तपासणी केली जात आहे.

 

बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण परिसराची दोनदा झडती घेतली. रात्रीच्या वेळीही राजपथावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सुरक्षा किती कडक करण्यात आली आहे.
रात्री वेगळ्या पोलिसांची ड्युटी, तर दिवसा वेगळ्या पोलिसांची ड्युटी असते.
आयईडी सापडण्यापूर्वी राजपथवर दिवसाच सुरक्षा होती.

गुप्तचर विभाग आणि लष्कराने घेतली माहिती
प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुप्तचर विभाग (IB) आणि लष्कर, दिल्ली पोलिसांसह सोमवारी राजपथवर पोहोचले. यावेळी सुरक्षा व्यवस्था अनेक पैलूंमधून पाहिली गेली.

 

सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी देशाचा गुप्तचर विभाग आणि लष्कराने दिल्ली पोलिसांना काही सूचना दिल्या.
विशेष म्हणजे 20 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येते.
मात्र यावेळी गाजीपुर फुल बाजारात आयईडी सापडल्याने 15 जानेवारीपासून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Republic Day Parade | this time republic day parade will start half an hour late due to corona protocol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा