Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मेट्रो प्रशासनाला सवाल; म्हणाले – ‘पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी पुण्यात (Pune News) आले होते. पुणे मेट्रोच्या (Pune Metro) फुगेवाडी स्टेशनला अचानक भेट दिली. त्यानंतर पवार यांनी फुगेवाडी (Phugewadi) ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मेट्रोने प्रवासही केला. या प्रवासानंतर भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मेट्रो प्रशासनाविरोधात (Metro Administration) हक्कभंग प्रस्ताव केले जाणार असल्याचे म्हणाले. त्यानंतर पुणे महामेट्रोने याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी महामेट्रोला सवाल केला आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाला सवाल केले आहेत. ”राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मेट्रो प्रवासाबाबत महामेट्रोचा खुलासा वाचून हसूच आलं. पवार साहेबांना माहिती घेण्यासाठी स्वतः मेट्रो स्टेशनला जावं लागलं? बरं, तेही मान्य, पण मेट्रोप्रवासाचं काय? एक चक्कर मारून आणा असा हट्ट पवार साहेबांनी केला, असं तरी महामेट्रोनं सांगू नये! महामेट्रोच्या खुलाशातलं साडेचार वर्षांत पवार साहेब कधीच फिरकले नाहीत, हे वाक्य महत्त्वाचं… प्रकल्प पूर्ण होताना त्यांना तिकडे जावंसं वाटलं, ही भेट गुप्त ठेवावी लागली यातून बरंच काही स्पष्ट होतंय. हे सगळं आयत्या पिठावरच्या रेघोट्या असंच नाहीये का?” असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

याआधी चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे
प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोक प्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी
घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासना विरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

 

Web Title :- Chandrakant Patil | did sharad pawar insist taking detour through metro chandrakant patil question pune mahametro

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Numerology | अंकराशी 19 जानेवारी ! ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना दिवसभरात मिळतील अनेक संधी, विनकारण खर्च होईल पैसा

 

Amazon Great Republic Day Sale | iQOO प्रीमियम स्मार्टफोन्सवरबंपर 8000 रुपयांपर्यंत सूट; स्वस्तात खरेदी करू शकता ‘फ्लॅगशीप’ स्मार्टफोन

 

Nitish Bharadwaj- IAS Smita Gate | 12 वर्षांनंतर टीव्हीवरील ‘श्री कृष्ण’ नितीश भारद्वाज यांचं दुसरे लग्नही मोडलं, पत्नी स्मिता IAS अधिकारी