PM Kisan | सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत पैसे, तात्काळ करा अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. आता PM Kisan च्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. रेशनकार्ड क्रमांक (Ration Card Number) आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi) चा लाभ मिळू शकेल.

 

या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक (Ration Card Mandatory) असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

 

आता द्यावी लागणार ही कागदपत्रे
जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे.

 

आता सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

सरकार दरवर्षी शेतकर्‍यांना देते 6000 रुपये
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत (PM Kisan) देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.
शासन ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करते.
तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही.

 

तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेत तुमचे नाव नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

 

तीन हप्त्यांमध्ये मिळतात पैसे
पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकर्‍यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली जाते.

 

पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.

 

याप्रमाणे ऑनलाइन तपासू शकता नाव
प्रथम पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
आता होम पेजवर फार्मर्स कॉर्नरवर जा. येथे लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करा.
या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील द्या.
सर्व माहिती भरल्यानंतर Get Report वर क्लिक करताच संपूर्ण यादी येईल.

 

Web Title :- PM Kisan | pm kisan government has changed the rules ration card is mandatory for new instalment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मेट्रो प्रशासनाला सवाल; म्हणाले – ‘पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?’

 

Shahrukh Khan | शाहरूखच्या ‘मन्नत’ मध्ये घुसला होता त्याचा ‘जबरा’ फॅन, कपडे काढून केलं असं काही की…

 

Indian Railways | तुमच्या ट्रेन तिकिटावर इतर कुणीही व्यक्ती करू शकतो प्रवास ! रेल्वेने दिली सुविधा, जाणून घ्या कशी?