Republican Party | पुणे शहरातील समस्यावर रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Republican Party | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात आली आहे. यानंतर 15 मार्च पासून राज्य शासनाने (State Government) पुणे मनपाचे कामकाज करण्याकरता महापालिका आयुक्त यांची प्रशासक (Administrator) म्हणून नेमणूक केली आहे. त्या अनुषंगाने पुणे मनपा हद्दीतील विविध समस्या बाबत रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) वतीने शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण (City President Shailendra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्याकरिता टोल फ्री हेल्पलाईन (Toll Free Helpline) उपलब्ध आहे परंतु त्याची कडक अंमलबजावणी होत नसलयाने समस्यांचे निवारण होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच शहरी गरीब योजना अंतर्गत खाजगी रुग्णांना मनपाने पैसे न दिल्याने अनेक गरजवंत रूग्णांना उपचार देण्यास खाजगी रुग्णालय टाळाटाळ करत आहेत. (Republican Party)

खाजगी रुग्णालयाचे बिल (Private Hospital Bill) अदा करावेत तसेच अधिकृत पथारी व्यवसायिक यांच्यावर देखील अतिक्रमण कारवाई होत असल्याचे ही निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचप्रमाणे समाज कल्याणच्या (Social Welfare) अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ 31 मार्चपूर्वी लाभार्थ्यांना देण्यात यावा. त्याचप्रमाणे 11 एप्रिल महात्मा फुले (Mahatma Phule) जयंती व 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मंडप उभारून नागरिकांना सुविधा देण्यात याव्या याबाबत आयुक्तांची भेट घेण्यात आली.

 

यावेळी शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर (Former Deputy Mayor Sunita Wadekar), माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende),
प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे,
अॅड. मंदार जोशी, अशोक शिरोळे, संगीता आठवले, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट,
श्याम सदाफुले, वसंत बनसोडे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title :- Republican Party | A delegation of the Republican Party met the Commissioner on the issue of Pune city


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | ‘गुस्सा क्यू आता है..!’ अजित पवारांनी प्रवीण दरेकरांची उडवली ‘खिल्ली’