राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी

कर्नाटक : वृत्तसंस्था

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे बी एस येडियुरप्पा हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे राजीनामा दिला असला तरी, अल्पावधीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर नवे रेकॉर्ड तयार झाले आहे. येडियुरप्पा हे ५५ तासांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

येडियुरप्पा यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर १९ मे २०१८ रोजी त्यांनी कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला.

सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री-

येडियुरप्पा (कर्नाटक) -५५ तास (सव्वा दोन दिवस), जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) – तीन दिवस, सतीश प्रसाद सिंग (बिहार) – पाच दिवस, जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) – २४ दिवस, बी पी मंडल (बिहार) -३१ दिवस, एन भास्कर राव (आंध्र प्रदेश) – ३१ दिवस, सी एच मोहम्मद कोया (केरळ) – ४५ दिवस.

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ
कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान