Coronavirus Impact : देशातील 5 लाख रेस्टॉरंट 31 मार्चपर्यंत बंद, बाहेर जेवणाऱ्यांची ‘तारांबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेस्टॉरंट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 5 लाख पेक्षा जास्त रेस्टॉरंटचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनने 18 मार्चपासून 31 मार्चपर्यंत रेस्टॉरंट बंद करण्याची सूचना केली आहे. यामुळे देशातील जवळपास 5 लाख रेस्टॉरंट बंद करण्यात येऊ शकतात. परंतु हे रेस्टॉरेंटच्या मालकांवर अवलंबून आहे की ते रेस्टॉरंट बंद करणार आहे की नाही. यात सर्वात जास्त त्या लोकांना फटका बसेल जे बाहेर जेवण करतात.

व्यवसायावर होतोय परिणाम –
NRAI ने जारी केलेल्या सूचनेत सांगण्यात आले की कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने आम्ही असा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे. परंतु ग्राहक, कर्मचारी यांची सुरक्षा पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे. NRAI च्या मते आमचे अनेक कर्मचारी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. या दरम्यान त्यांना कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी असोसिएशनने आपल्या सर्व सदस्यांना हा सल्ला दिला आहे.

वर्क फ्रॉम होम –
कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी खासगी कंपन्या देखील खबरदारी घेत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करण्याची सुविधा दिली आहे. जेणे करुन लोक सार्वजनिक वाहनाने प्रवास टाळतील. राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत, ज्यात शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तसेच अनेक परिक्षा रद्द केल्या आहेत.

देशात रुग्णांची संख्या 172 वर –
देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 172 झाली आहे. केरळ, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, लडाख, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमित आढळले.