Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘सध्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | राज्यात कोरोना (Corona Virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant) रूग्ण आढळून येत आहे. दैनंदिन कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात काही निर्बंध (Restrictions in Maharashtra) घातले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) लागेल का? याचे तर्क वितर्क केले जात आहेत. परंतु, आज (शनिवारी) राज्यातील लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘राज्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

राजेश टोपे म्हणाले, ‘सद्य राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाही. लॉकडाऊनबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार नाही. परंतु, उपाययोजना म्हणून निर्बंध (Restrictions in Maharashtra) वाढवण्यात येणार आहे. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल,’ असं राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नसल्याचे टोपे यांनी सांगितल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘मुंबईतील रुग्ण संख्या वाढण्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) 10 च्या जवळपास गेला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. मेट्रो शहरांत निर्बंध अधिक कठोर केले जाऊ शकतात. परंतु, सध्या लॉकडाऊनची भीती बाळगू नका. रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते.
रुग्णालयांना किट्स वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉन आणि डेल्टा रुग्णांना ओळखणे गरजेचे आहे.
सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे.
रुग्णांची संख्या वाढू नये तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य असल्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

 

 

Web Title :- Restrictions in Maharashtra | now no lockdown in maharashtra but Restrictions rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price | नवीन वर्षात सोने खरेदी करण्याची चांगली संधी, सोन्याच्या किमतीत 6 वर्षात सर्वात मोठी घसरण

 

Pune Crime | पुण्याच्या फरासखान्यातील पोलिसाने दिली ‘दत्तवाडी’च्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, प्रचंड खळबळ

 

CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय