CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे नुकतंच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही (Maharashtra Winter Session) मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित नव्हते. अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नसल्याने विरोधकांनी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला. याच मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. अशातच भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये (Aurangabad News) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सध्या आजारी आहे. अशात राज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे,’ असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे,’ असा पर्याय रावसाहेब दानवे यांनी सुचवला आहे.

पुढे रावसाहेब दानवे म्हणाले, ‘मुख्यमंत्री आजारी असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत.
त्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांच्या आजारपणामुळे राज्याला सध्या प्रमुखच नाही.
अशात कुणाला तरी प्रमुख म्हणून नेमायला हवे. शिवसेनेत एकनाथ शिंदे सारखे नेते आहेत,
त्यांना प्रमुख म्हणून नेमायला हवे किंवा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत, त्यांनाही प्रमुख म्हणून नेमावे.’ असं ते म्हणाले.

 

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | bjp leader raosaheb danve suggest uddhav thackeray ill make eknath shinde chief minister

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

Covid Vaccine Child Registration | 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी सुरू झाले आजपासून रजिस्ट्रेशन, Aadhar Card शिवाय सुद्धा करू शकता नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर आधार देईल प्रधानमंत्री वय वंदना योजना, दर महिना मिळेल 9,250 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पर्स, चप्पल चोरीचा आळ घेतल्याने 17 वर्षाच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, घरमालक महिलेवर गुन्हा