सुप्रीम कोर्टाचे ‘हे’ निवृत्त न्यायाधीश ब्रिटनच्या कोर्टात फरार नीरव मोदीच्या बाजूनं ‘साक्षीदार’ म्हणून राहतील हजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू हे फरार डायमंड व्यापारी नीरव मोदी यांच्या बाजूने साक्षीदार म्हणून हजर होतील. एका वृत्तपत्राकडे खुद्द काटजू यांनी याबाबत पुष्टी केली आहे. नीरव यांच्या भारत प्रत्यार्पणाच्या सरकारच्या याचिकेचा त्यांनी विरोध केला आहे.

न्यायमूर्ती काटजू यांनी एका वृत्तपत्रास सांगितले की, ‘मी उद्या नीरव मोदींसाठी साक्षी म्हणून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) ब्रिटनच्या कोर्टात हजर होईल. परंतु मी या खटल्याच्या गुणवत्तेवर भाष्य करणार नाही. मी एवढेच म्हणेन की त्यांना भारतात न्याय मिळणार नाही.’ काटजू यांनी नीरवच्या प्रत्यार्पणाच्या भारताच्या याचिकेविरूद्ध आपले मत नोंदवले आहे. फरार डायमंड व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या याचिकेवर ब्रिटनच्या एका कोर्टात सुनावणी होणार आहे.

तसेच न्यायमूर्ती काटजू यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या लिखित निवेदनात असे म्हटले आहे की नीरव मोदी यांना भारतात स्वतंत्र व निष्पक्ष ट्रायल मिळण्याची शक्यता नाही. ते म्हणाले की नीरवला भारतीय मीडिया आणि विद्यमान आस्थापनांनी यापूर्वीच ‘दोषी’ घोषित केले आहे.