RFL केस : 2300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ‘रॅनबॅक्सी’च्या माजी प्रवर्तकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रॅनबॅक्सी ही औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. रेलिगेयर फिनवेस्ट लिमिडेट (आरएफएल) फंडात करण्यात आलेल्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. यात एकूण 2300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. रेलिगेयर एंटरप्रायजेजचे माजी सीएमडी सुनील गोधवानी यांना देखील अटक करण्यात आली आहे.

मलविंदर सिंह आणि सुनील गोधवानी यांच्यावर आरएफएल फंडात घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात 2396 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तिहार तुरुंगात असलेल्या या दोघांचा ईडीकडून ताबा घेण्यात आला आहे. सध्या या घोटाळ्याप्रकरणी दोघेही तिहार जेलमध्ये आहेत. ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित वकीलांनी दिली. या दोघांनाही कारागृह महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी या दोघांच्या कोठडीची मागणी करणार आहे.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्टोबर महिन्यात मलविंदर, त्यांचा भाऊ शिविंदर, गोधवानी, अनिल सक्सेना, कवी, अरोरा यांना अटक करण्यात आली होती. रेलिगेयर फिनवेस्ट लिमिडेटने डिसेंबर 2018 साली दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या सर्वांची चौकशी देखील केली होती. या चौकशीनंतर मलविंदर सिंह आणि सुनील गोधवानी यांना पोलिसांनी तुरुंगात धाडले होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like