ड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती, सुशांतसह इतर मोठया लोकांना करत होती ‘पुरवठा’, NCB नं कोर्टात सांगितलं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या जामिनाचा विरोध करत दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले की, हे ड्रग सिंडिकेटचे सक्रिय सदस्य आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून दाखल उत्तरात म्हटले गेले आहे की, याबाबत ठोस पुरावे आहेत कि रियाने ड्रग तस्करीला वित्त पुरवठा केला. व्हाट्सऍप चॅट, मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमधून मिळालेले रेकॉर्ड सांगतात की, रिया चक्रवर्ती सतत याचा करार करत होती, तसेच बेकादेशीरपणे या व्यापारात वित्त पुरवठाही करत होती.

एनसीबीने प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, हे माहिती असतानाही कि सुशांत सिंह राजपूत ड्रग घेत आहे, रियाने यात त्याला पाठिंबा दिला आणि लपवले. एनसीबीने म्हटले, “जर पूर्ण परिदृश्य पाहिले तर सध्याचे अर्जदारा (रिया) ने हे माहिती असतानाही सुशांत सिंह राजपूत ड्रग घेत आहे, तिने त्याला प्रोत्साहन दिले. सध्याच्या अर्जदाराने आपल्या घरात ड्रग्जचा साठा केला आणि सुशांत सिंह राजपूतलाही देत होती.”

तपास यंत्रणेने असेही म्हटले की, रिया उच्च समाजातील व्यक्तींसाठी ड्रग डिलिव्हरीशी संबंधित होती. एनसीबीने म्हटले, “ती उच्च समाजातील व्यक्तींशी संबंधित ड्रग सिंडिकेटची सक्रिय सदस्य आहे. याबाबत ठोस पुरावे आहेत कि ती ड्रग्ज तस्करीमध्ये सामील होती. रिया चक्रवर्ती ड्रग डिलिव्हरी करत होती आणि क्रेडिट कार्ड, कॅश आणि पेमेंट गेटवेच्या माध्यमातून करत होती.”

महत्वाचे म्हणजे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. ती मागील काही दिवसांपासून मुंबईतील भायखळा तुरुंगात बंद आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने तिला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like