मुंबई, ता. ७ : पोलीसनामा ऑनलाइन : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि NCB एनसीबी NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं की काय? अशा प्रश्नाभोवती सध्या चौकशी सुरु आहे. मात्र चौकशीदरम्यान रिया सर्व आरोप सातत्यानं फेटाळत आहे. मात्र, अजूनही मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, NCB द्वारे रियाची चौकशी सुरु आहे.
अन् या चौकशीदरम्यान तिनं सुशांतच्या बहिणीचं नाव घेतलं.
ती आणि तिचा पती देखील अंमली पदार्थांचं सेवन करतात असा आरोप तिनं केला.
शिवाय हा आरोप सिद्ध करण्यासाठी काही पुरावे देखील सादर केले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.
आधी संशयाची सुई अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर होती.
त्यानंतर तिचा भाऊ आणि वडिलांचं पुढे आलं.
अन् आता या प्रकरणात सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती आणि तिच्या पतीचं नाव पुढे येत आहे.
सुशांतची बहीणच त्याला ड्रग्स पुरवायची…
या प्रकरणी रियाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिनं सुशांतच्या बहिणीचं नाव घेतलं. “सुशांतची बहिणी आणि तिचा पती देखील ड्रग्सचं सेवन करतात. सुशांत माझ्या आयुष्यात येण्यापुर्वीपासूनच ड्रग्ज घेत होता. तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. तो माझ्याकडे यायचा कारण त्याला ड्रग्स मिळतील अशी आशा होती. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना सर्व माहिती आहे. मी त्याला रुग्णालयात भरती करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु तो त्यासाठी तयार नव्हता. सुशांतची बहिणच त्याला ड्रग्स पुरवायची.” असा दावा रियानं केला आहे. अर्थात दावा अद्याप सिद्ध झालेला नाही. शिवाय रियाच्या या दाव्यावर अद्याप किर्तीनं कुठलीही अधिकृत प्रत्युत्तर दिलेलं नाही. सुशांतला अंमली पदार्थांचं व्यसन लावल्याचे आरोप रिया आणि तिचा भाऊ शौविकवर आहे.
‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली लग्नगाठ !
‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा