शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेणारा हॉलिवूडचा ‘हा’ दिग्गज अभिनेता वयाच्या ६९ व्या वर्षी बनला बाबा

मुंबई : वृत्तसंस्था – २००७ साली जयपूरमधील एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेऊन वादात सापडलेला हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता रिचर्ड गेर वयाच्या ६९ वर्षी बाबा झाला आहे. रिचर्ड यांचे हे तिसरे अपत्य असून याआधी त्यांना दोन पत्नींपासून दोन मुले आहेत. रिचर्ड त्यांची तीसरी पत्नी अलजेन्ड्रा सिल्व्हा हिने या बाळाला जन्म दिला आहे.

१९८०-९० च्या दशकात रिचर्ड हॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रीटी वुमन, प्राइमल फियर, अमेरिकन जिगोलो, शॅल वी डान्स या चित्रपटांनी तुफान यश मिळवले होते. काळानुरुप त्याला आपल्या अभिनयामध्ये बदल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नवीन अभिनेत्यांपुढे त्यांची लोकप्रियता ढासळली. आणि यामुळे रिचर्डचे चित्रपट गर्दी खेचण्यात अपयशी ठरले. रिचर्डने ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

अलजेन्ड्रा सिल्व्हा ही रिचर्ड गेर यांची तीसरी पत्नी आहे. याआधी त्यांनी अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड व केरी लॉवेल या दोघींशी लग्न केले होते. २०१५ साली त्यांनी आपली दुसरी पत्नी सिंडी क्रॉफर्डला घटस्फोट दिला. त्यानंतर ते ३५ वर्षीय अभिनेत्री अलजेन्ड्रा सिल्व्हाला डेट करु लागले. गेल्याच वर्षी दोघांनी लग्न केले.

रिचर्ड गेर यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. हे दृष्य पाहून अनेकांनी रिचर्डवर जोरदार टीका केली होती. शिल्पा व रिचर्ड या दोघांविरोधात एका सामाजिक संस्थेने अश्लिलतेचा प्रचार केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी याबाबात पोलिस तक्रार देखिल केली होती. मात्र कोर्टाने केवळ हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असे असे सांगून याचिका फेटाळून लावली होती.यावर शिल्पा शेट्टीने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

Shilpa-Shetty--Richard-Gere