Pune BJP | अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ला प्रभाग 16 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ! 15500 हून अधिक घरांमध्ये संपर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP | दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ (Atalshakti Mahasampark Abhiyan) अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये साडेपंधरा हजार घरांमध्ये संपर्क करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या (Pune BJP) वतीने सुरू करण्यात योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

सोमवार पेठ (Somwar Peth), मंगळवार पेठ (Mangalwar Peth), रास्ता पेठ (Rasta Peth) या भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये या अभियानाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (PMC House Leader Ganesh Bidkar) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात दोन दिवसात प्रभागातील साडेपंधरा हजाराहून अधिक घरांमध्ये संपर्क साधण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना पुणेकरांपर्यंत पोहोचविणे, तसेच पुणे महापालिकेत (Pune Corporation) सत्ताधारी म्हणून काम करताना गेल्या साडेचार वर्षात नागरिकांसाठी तसेच शहराच्या विकासासाठी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजना तसेच महत्वपूर्ण प्रकल्पांची माहिती नागरिकांना देणे आणि व्यापक जनसंपर्क करणे, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. तसेच या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झालेले आहे.

 

 

नागरिकांच्या घरी गेल्यानंतर त्यांना या अभियानाची पुस्तिका भेट देणे, भेट दिलेल्या घरात केंद्र सरकारच्या अभियानाचे लाभार्थी असल्यास त्यांच्याकडून त्याबाबत अभिप्राय घेणे, पक्षाचे कॉल सेंटर, मतदार नोंदणी, युट्यूब चॅनेल यांची माहिती नागरिकांना देणे यासाठी प्राधान्य दिले जात आहे. एका घरात चार लोक राहतात या गृहितकावर हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक भेटीचा तपशील मोबाईल ॲपमध्ये देखील नोंदविला जात असल्याचे सभागृह नेते बिडकर (Ganesh Bidkar) यांनी स्पष्ट केले. (Pune BJP)

या अभियानाच्या माध्यमातून मोदी सरकारने (Modi Government) नागरिकांसाठी कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या (PMC) वतीने शहरात सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प यांची सविस्तर माहिती दिली जात आहे. या भेटी दरम्यान नागरिक त्यांना असलेल्या तक्रारी आणि समस्या देखील सांगत आहेत.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
(Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation)

 

 

 

Web Title :- Pune BJP | Spontaneous response to AtalShakti Mahasampark Abhiyan in prabhag 16 of pmc area ! Contacts in over 15500 homes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ration Card शिवाय सुद्धा हे लोक घेऊ शकतात सबसिडीचे धान्य, सरकार ‘या’ प्लानवर करतंय काम; जाणून घ्या

 

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

 

ST Workers Strike | ‘मी खुर्चीत असतो तर…’, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

 

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

 

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक