‘गब्बर’ शिखर धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला भारतीय संघात स्थान ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये जखमी झाल्यामुळे भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवनला बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड करताना अंतिम १५ खेळाडूंमध्ये समावेश करण्यासाठी ऋषभ पंतला दावेदार मानले जात होते. परंतु संघ निवडकर्त्यांनी दिनेश कार्तिकची निवड केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची शिखर धवनच्या जागी निवड होणे निश्चित मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला झाली होती दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज पॅट कमिंसच्या चेंडूंमुळे धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. या सामन्यात शिखर धवनने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. धवनला तीन आठवड्याची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

अनुभवाच्या बाबतीत दिनेश कार्तिक सरस

भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतची निवड अंतिम १५ खेळाडूंमध्ये केली नव्हती. पंत अनुभवाच्या बाबतीत कार्तिक पेक्षा मागे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऋषभ पंतला लवकरच भारतीय संघात सामील होण्यासाठी इंग्लंडला रवाना व्हावे लागेल. २१ वर्षीय पंत पुढील ४८ तासात इंग्लंडच्या दिशेने रवाना होऊ शकतो.

पाकिस्तानच्या विरुद्ध खेळणार पंत

गुरुवारी १३ जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पंत सामील होऊ शकणार नाही. परंतु पाकिस्तानच्या विरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऋषभ पंतचा समावेश होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिखर धवनच्या गैरहजेरीत लोकेश राहुल रोहित शर्मा सोबत सलामीच्या फलंदाजीला उतरेल.

आरोग्य विषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘