Rising Inflation Rate | खाद्यपदार्थांमुळे महागाई वाढत असल्याने आरबीआयने घ्यावी दक्षता; पतधोरण समितीच्या सदस्यांनी दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन – Rising Inflation Rate | सर्व सामान्य लोकांना सध्या महागाईचा जोरदार फटका बसत आहे. मागील वर्षभरामधील या महागाईने उच्चांक (Rising Inflation Rate) गाठला असून यामुळे बँकेचे व्याजदर (Bank Interest Rate) महाग होणार असल्याची देखील शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) पतधोरण समितीच्या दोन सदस्यांनी देखील याबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. सार्वजनिक खर्च (Public Expenditure) कमी करु नये असे देखील सदस्यांनी बॅंकांना सुचवले आहे.

देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सामान्य लोकांना बसत असून यामुळे कर्ज देखील महागले आहे. बॅंकेचे व्याजदर देखील वाढले आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून 4 टक्के महागाई गृहित धरण्यात आली होती. यामधील 2 टक्के महागाई आणि 2 टक्के अधिकचे गृहित धरले जातात. मात्र ही देखील टक्केवारी महागाईने ओलांडली असून आता 7.44 टक्क्यांवर महागाई वाढली आहे. यामागे खाद्यपदार्थांचे भाव वाढणे हे कारण कारणीभूत ठरत आहे. सध्या सरासरी देखील पाऊस न झाल्याने महागाई डोके वर काढत आहे. पाऊस चांगला होत नसल्याने कडधान्ये, डाळी व खरीप पिकांची लागवड चांगली न झाल्याने पुरवठा कमी होऊन खाद्यपदार्थांचे भाव वाढले आहेत. खाद्यपदार्थाच्या वाढत्या किंमतीबाबत आरबीआयच्या पतधोरण समितीचे (RBI Monetary Policy Committee) सदस्य शशांक भिडे (Shashank Bhide) व बाह्य सदस्य जयंत राम (Jayant Ram) यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

समितीचे सदस्य शशांक भिडे म्हणाले की, “खाद्यवस्तूंची महागाई नियंत्रणात आणणे हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. देशाअंतर्गत बाजारात पुरेसा पुरवठा होईल याची हमी घेण्याची आवश्यकता आहे. याचरोबर सार्वजनिक सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पुरेसा पाऊस पडलेला नसून, ही चिंतेची बाब आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पन्नावर परिणाम होणार आहे. देशातील सुमारे 65 टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यांचे जीवनमान कृषीवर अवलंबून आहे.” असे मत शशांक भिडे यांनी मांडले आहे.

तर जयंत राम म्हणाले की, “पतधोरण कठोर केल्याचे परिणाम अद्याप दिसून येत आहे.
पुढील काही तिमाहींमध्ये महागाईचा दर कमी झालेला दिसेल.
असे असले तरी महागाईत होणाऱ्या वाढीबद्दल रिझर्व्ह बँकेने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.
अपुऱ्या पावसामुळे मागणी आणि पुरवठाही कमी झाला आहे.
ग्रामीण भागातील मागणीवर आगामी महिन्यात लक्ष ठेवावे लागेल.” असे देखील जयंत राम यांनी सांगितले आहे.

देशातील महागाई वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने मागील वर्षातील मे महिन्यापासून व्याजदरात
अडीच टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे महागाई कमी होईल अशी अपेक्षा बॅंकेला होती.
मागील तीन पतधोरण आढाव्यांमध्ये व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
असे असले तरी महागाई वाढल्यास (Rising Inflation Rate) व्याजदरामध्ये वाढ होईल,
असे पतधोरण समितीच्या आढावा बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकाळभोर : बदनामी करण्याची धमकी देऊन रिल्सस्टार करुन उकळली खंडणी; चोरीचे सोने घेऊन बनला गोल्डन बॉय, सोशल मिडियावर केली बदनामी

Pune Crime News | हडपसर : वाद जागेचा, अत्याचार महिलांवर; घरात शिरुन बलात्कार करणार्‍यांना अटक, कारखाना मालकही जेरबंद