Pune Crime News | हडपसर : वाद जागेचा, अत्याचार महिलांवर; घरात शिरुन बलात्कार करणार्‍यांना अटक, कारखाना मालकही जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | हडपसर येथील शिंदे वस्तीतील जागेच्या मालकीवरुन असलेल्या वादातून दोन महिलांवर अत्याचार (Women Abuse) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाबत दोन्ही बाजूकडील तिघा पुरुषांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे वस्तीत कारखान्यात काम करणार्‍या महिलेचे पती रात्री ड्युटीवर गेले होते. त्यावेळी मालकाने कारखान्यात ऑर्डर आहे, असे खोटे सांगून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर पतीला व मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकविणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार करुन मानसिक छळ केला. याप्रकरणी पोलिसांनी कारखाना मालकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

दुसरी घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने दोघे जण घरात शिरले.
त्यांनी फिर्यादी महिलेवर आळीपाळीने बलात्कार (Rape Case) केला. याप्रकरणात पोलिसांनी किसन राकेश मिश्रा
Kisan Rakesh Mishra (वय २०) आणि लवकुश तिवारी (वय ३५) यांना अटक केली आहे.
या दोन्ही घटनांमध्ये मुळ वाद हा जागेवरुन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स

Siddharth Chandekar | अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं ‘माझे स्वेटशर्ट्स चोरू नकोस’ अशी वॉर्निंग देत केली पोस्ट शेअर