Covid-19 : नोटांद्वारे ‘कोरोना’ व्हायरस पसरण्याचा धोका ? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगभरात आता पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्यातच हिवाळा सुरू असून, थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशातच नोटांच्या वापरातून कोरोनाचा प्रसार होतो (From the use of notes spread corona) का ? याबाबतचा मोठा खुलासा बॅंकांनी केलेल्या संशाेधनातून समोर (big-revelation-bank-research)आला आहे.

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, नोटांच्या वापरातून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका खूप कमी आहे. बँक ऑफ इंग्लंडने केलेल्या एका संशोधनानुसार चलनी नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची जोखीम खूप कमी आहे. कोरोनाबाधित रुग्ण जेव्हा नोटावर शिंकतो, त्यानंतर एका तासाने त्यावर चिकटलेला विषाणू प्रभावहीन होतो. सहा तासांनंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव हा 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी झालेला असतो. नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका फारच कमी आहे. कारण या नोटा साधारणपणे पर्समध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. यामुळे कोरोना संक्रमित व्य़क्ती या नोटांना हात लावण्याची शक्यता खूप कमी असते. अहवालात नोटांवर अन्य़ वस्तूंच्या तुलनेत कोरोनाचे अस्तित्व खूप कमी आढळत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे.

…अन् 30 सेकंदांत व्हायरस मरतो

मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात; परंतु तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोना व्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे.

You might also like